IMPIMP

Kalyani Nagar Car Accident Pune | आरोपी मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालचे डोके चक्रावणारे उपद्व्याप; वाचा काय-काय उद्दोग केले

by sachinsitapure

पुणे: Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरण रोज वेगवेगळे वळण घेत आहे. आरोपी मुलाच्यारक्त तपासणी अहवालात फेरफार (Blood Sample Temparing) केल्याची नुकतीच माहिती समोर आली होती (Porsche Car Accident Pune) . या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली.

आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अपघात प्रकरणातील आरोपी मुलाने मद्यपान केले नव्हते हे सिद्ध करण्यासाठी रक्ताचे नमुने मिळत्या- जुळत्या व्यक्तीचे वापरण्याचा सल्ला डॉ. तावरेंनी (Dr Ajay Taware) दिलेला होता.

अपघाताच्या रात्री दोन व्यक्ती कारमधून आल्या आणि त्यांनी अतुल घटकांबळे या ससूनच्या (Sassoon Hospital) कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आणि पैशाची बोलणी केली आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या सोबतच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी त्यांचे रक्ताचे नमुने हे तिघांचे रक्त गट ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयाच्या ४० नंबर वॉर्ड मध्ये घेतले गेले.

तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या रक्त गटाशी ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना ससून मध्ये आणण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या तीन व्यक्तींचा आता पुणे पोलीस (Pune Police) शोध घेत आहेत. हे तीन व्यक्ती सापडले तर या तिघांवरदेखील कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आता रक्त देणाऱ्या तीन व्यक्ती आणि त्या रात्री गाडीतून ससून रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्ती पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत.

Related Posts