IMPIMP

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मी दारु पितो, पप्पांनीच मला गाडी दिली’ आरोपी मुलाचा कबुली जबाब

by sachinsitapure

पुणे :- Kalyani Nagar Pune Accident | मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही. तरी देखील पप्पांनी त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने ही माहिती पोलिसांना दिली आहे.

आरोपी अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal Arrest) याचा मुलगा आहे. अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये गाडी कशी दिली म्हणून विशाल अगरवाल याच्यावर देखील गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल Cosie Pune चे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक राजेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

बाल न्याय मंडळासमोर रविवारी (दि.19) वडिलांनी देखील मुलीला दारुचे व्यसन लागल्याचे मान्य केले होते. हे सर्व माहिती असूनही मुलाच्या हातात कार देणारे वडील देखील तितकेच दोषी आहेत. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ‘ब्रह्मा’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Rains | पुण्यात चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती

Related Posts