IMPIMP

Katraj Pune Crime News | पुणे : उन्हामुळे दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला. चोरट्यांनी 23 लाखांची रोकड पळवली

by sachinsitapure

पुणे :  – Katraj Pune Crime News | मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहेत. अशातच रणरणत्या उन्हात दुचाकीवरुन जाणाऱ्या एका कामगाराला अचानक चक्कर आली. त्यामुळे त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला झाडीत पडला. त्याला मदत करण्याऐवजी अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे असलेली 23 लाख 50 हजार रुपयांची बॅग घेऊन पळून गेला.

ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज घाटातील (Katraj Ghat Pune) हॉलीडे हॉटेलजवळ (Holiday Hotel Pune) 29 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बावधन खु. (Bavdhan Khurd) येथे राहणाऱ्या 35 वर्षीय उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात आयपीसी 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस कात्रट घाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara Highway) वेळू गावात एक खासगी कंपनी आहे. कंपनीच्या कामासाठी 23 लाख 50 हजार रुपये घेऊन फिर्यादी यांचा कामगार कात्रज घाटातून निघाला होता. घाटातील कात्रज घाटातील हॉलीडे हॉटेलजवळ असलेल्या वळणावर कामगाराला अचानक चक्कर आली. त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. उन्हामुळे काहीवेळ त्याची शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत झोपला होता.

त्याने पैशांची बॅक गाडीच्या हँडलला अडकवली होती. त्यावेळी चोरटे आले आणि त्यांनी पैशांची बॅग घेऊन पळून गेले. हा प्रकार लक्षात येताच कामगाराने याची माहिती कंपनीच्या मालकाला दिली. त्यानंतर उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्ररा दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुप्ता करीत आहेत.

Related Posts