IMPIMP

Lonavala Bhushi Dam | लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांची मोठी गर्दी

by sachinsitapure

लोणावळा : Lonavala Bhushi Dam | लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले पर्यटन स्थळ म्हणून भुशी धरणाची ओळख आहे. दरवर्षी भुशी धरण भरण्याची पर्यटक वाट पाहात असतात. आज विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली होती.

https://www.instagram.com/p/C81pxlFJv3t/

लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेले भुशी धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. पुणे आणि मुंबई यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक हे केवळ भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. इथून पुढे काही दिवस लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, आणि टायगर पॉईंट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची लोणावळा येथे गर्दी होऊ लागली आहे. पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.

Related Posts