IMPIMP

Madha Lok Sabha | माढा मतदारसंघात ट्विस्ट! ‘या’ गटाचा पाठिंबा जाहीर; धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली

by sachinsitapure

माढा :  – Madha Lok Sabha | माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) तर महायुतीकडून (Mahayuti Candidate) रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) निवडणूक लढवत आहेत. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी आधी मोहिते-पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता माढा मतदारसंघात आणखी ट्विस्ट आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील याना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

भाजपने नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर भाजपात असणारे मोहिते-पाटील यांनी नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत नाराजी व्यक्त केली. यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांना उमेदवारी जाहीर करुन भाजपला तगडे आव्हान दिले. दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.

त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला. यानंतर आता कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूरमधील राजकारणातही मोठे बदल झाल्याचे दिसत आहे. आज पंढरपूरातील भालके गटाने बैठक घेत पाठिंबा देण्याबाबत चर्चा करुन पाठिंबा जाहीर केला.

Related Posts