IMPIMP

Maharashtra 12th HSC Results 2024 | 12 वी च्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी, एकुण निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल

by sachinsitapure

पुणे : Maharashtra 12th HSC Results 2024 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर आज जाहीर (Maharashtra Board Class 12th Results 2024 Announced) झाला आला. यंदाचा १२ वीचा एकुण निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून विभागाचा ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी ९१.९५ टक्के निकाल आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९२.६० टक्के मुले, तर ९५.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. दरम्यान, विद्यार्थी, पालकांना निकाल दुपारी एक वाजल्यापासून mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून पाहता येईल.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) म्हणाले, बारावीची सहा माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षेचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर जाहीर होण्यास मदत झाली. गैरप्रकारांची संख्या घटली. राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावरही स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.

Pune Crime News | पुणे : जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, तडीपार गुन्हेगाराला अटक

Related Posts