IMPIMP

Mahayuti Activists On Ajit Pawar | ‘अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा’; भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्याची खदखद

by sachinsitapure

पुणे: Mahayuti Activists On Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shivsena Eknath Shinde) अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर फोडत आहे. तसेच अजित पवारांवर मित्रपक्षातील नेत्यांकडूनच टीका होताना दिसत आहे. मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसभेला अजित पवारांना सोबत घेऊन चूक केल्याचे म्हंटले होते. तसेच संघाच्या मुखपत्रातूनही असाच सूर उमटला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती एकत्र असणार का ? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान भाजपची शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको असं भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. अजित पवारांनी सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. अजितदादांसाठी सत्ता आणायची का? असा सवालही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. त्याच राष्ट्रवादीच्या अजित दादांना एकत्र बसवलं आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली आहे.

Related Posts