IMPIMP

Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 27 हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा

by sachinsitapure

पुणे : – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजप उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील 27 हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindutvadi Organisations) मुरलीधऱ मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये तरुणाची संख्या लक्षणीय असून मोहोळ यांच्या बाईक रॅलीला (Murlidhar Mohol Bike Rally) मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर करताना संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत. त्यामुळे आमचा मुरलीअण्णांना पाठिंबा आहे,’ यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले अशा भावना आपल्यासमोरच व्यक्त होतात, तेव्हा आपण जपलेली श्रद्धा, भावना केवळ आपली नाही, ती करोडो भारतीयांची आहे, याची खात्री पटते, अशी भावना मोहोळ यांनी व्यक्त केली.

सकल हिंदू समाजाच्या (Sakal Hindu Samaj) वतीने पुणे शहरातील एकूण 27 हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात (Balgandharva Rang Mandir) हिंदू जनसंवाद मेळावा (Hindu Jansanwad Melava Pune) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला. त्यांचे सारेच निस्सीम कार्यकर्ते एकत्र आले होते. ही माणसं एका ध्येयानं झपाटलेली असतात. ती जेव्हा एखाद्याला आपलंसं मानतात, तेव्हा त्याच्या प्रत्येक कार्यात ती खंबीरपणे साथ देतात. त्यांचे प्रेम पाहून, भावना ऐकून हेलावून गेलो, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत कितीतरी जण मनमोकळं बोलत होते. इथं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे अनेक लोक निवडणूक म्हटली की आपल्या अपेक्षांचं गाठोडं घेऊन उभीच असतात. यांनी मात्र ‘आधी प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आणू, मग त्यांना हक्काने अपेक्षा आणि कामं सांगू. मुळात अण्णाला कामं सांगावीच लागत नाहीत. ती होतातच,’ असं आवर्जून विश्वासानं सांगितलं. आजवरच्या कामांतून हा विश्वास आपल्याला कमावता आला, याचंही समाधान वाटतं राहतं. हा मेळावा त्या अर्थाने खूप मानसिक बळ देणारा ठरल्याचे मोहोळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व प्रभू श्रीराम यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मेळाव्याचे प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडताना हिंदू म्हणुन संघटित राहण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला किशोर चव्हाण, पराग ठाकूर, दीपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे, संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनीही मनोगत व्यक्त कले. महेश पवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Posts