IMPIMP

Murlidhar Mohol Rally On Sinhagad Road Pune | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या सिंहगड रस्त्यावरील रॅलीला उदंड प्रतिसाद (Video)

by sachinsitapure

पुणे : – Murlidhar Mohol Rally On Sinhagad Road Pune | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे भाजप उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील विविध भागात रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला मुरलीधर मोहोळ यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने ओळखला जाणारा रस्ता, म्हणजेच सिंहगड रस्ता या परिसरात निघालेल्या बाइक रॅलीलाही (Murlidhar Mohol Bike Rally) शेकडो चाहत्यांनी पुढे येऊन भेटी दिल्या. हात मिळवण्यासाठी दाटीवाटी केली. या भागात अनेक नामवंत व्यावसायिकांबरोबरच ख्यातनाम विचारवंत-साहित्यिक-कलावंतही राहतात. शहराची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या या परिसरातील मतदारही प्रचंड उत्साही असल्याचे पाहायला मिळाले.

पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) येणाऱ्या या भागातील रॅलीला सायंकाळी विश्रांतीनगरपासून (Vishranti Nagar Pune) सुरुवात झाली. त्यानंतर आनंद विहार, हिंगणे पूल, ज्येष्ठ साहित्यिक भा.द. खेर चौक (संतोष हॉल), प्रगती विद्यालय, सरितानगरी, गणेशमळा, पानमळा, दांडेकर पूल आदी परिसरातून जात नीलायम चौकात रॅलीचा समारोप झाला. या सर्वच परिसरात केवळ जल्लोष आणि उत्साह होता. मतदारांना हस्तांदोलन करताना त्यांच्या भेटीची आतुरता जाणवत होती.

यावेळी महायुतीच्या उमेदवारालाच का मतदान करायचं, हे आवर्जून सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपलाही हातभार लागावा, म्हणून हे मतदान आवश्यक असल्याचं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांना केले. यावेळी त्यांच्यासमवेत पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह महायुतीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts