IMPIMP

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढाई आपण जिंकलीच पाहिजे – नाना पटोले

by sachinsitapure

पुणे : Nana Patole | ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला त्या लोकांना जनतेकडे मत मागणयाचा अधिकार नाही अशा शक्तींना या निवडणुकीत पराभूत करायचे आहे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कंबर कसून काम करावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पुणे लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व इंडिया आघाडीचे (India Aghadi) काँग्रेस पक्षाचे उमेदवार (Congress Candidate) आ. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये (Kothrud Vidhan Sabha) पुण्याई सभागृह येथे कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा महत्वाच्या प्रश्नांमुळे जनता त्रस्त झाली आहे. केंद्रातील मोदी सरकार मात्र कुंभकरणाप्रमाणे झोपी गेले आहे या निवडणूकीत मोदी सरकार पराभूत करून लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई आपण जिंकली पाहिजे असे म्हणत नाना पटोले यांनी उत्तम काम करीत असल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शाबासकी दिली.

या मेळाव्यात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक शिवा मंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी नगरसेवक चंदुशेठ कदम, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, आम आदमी पार्टी अभीजीत मोरे, इंटक अध्यक्ष बळीराम डोळे, रवींद्र माझीरे, राजेंश पळसकर, किशोर कांबळे, उमेश कंधारे, विजय खळदकर, नयना सोनार, सवीता मते, मनीषा करपे, ज्योती ताई, सुर्यवंशी, संगीता पवळे, छाया भोसले, पाडुरंग गायकवाड, अनिल मोकार, शिवाजी सोनार, सोमनाथ पवार, अमोल काळे, अमोल मोरे, शंकर वीर, राज जाधव, गोवींद थरकुडे, दता जाधव, संदीप मोकाटे, अनिकेत माने, बाबु पिसाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याचे प्रास्ताविक चंदूशेठ कदम यांनी केले. तसेच सुत्रसंचालन रवींद्र माझीरे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन यशराज पारखी यांनी केले. या मेळाव्याचे आयोजन चंदुशेठ कदम यांनी केले होते.

Related Posts