IMPIMP

Nitin Gadkari Pune Sabha | गरिबी दूर होईल, स्मार्ट सिटी नव्हे स्मार्ट व्हिलेज बनणार आहेत, हा देश विश्वगुरू बनणार ! एक माझे इंजिन आणि एक मोदींचे इंजिन लावून पुण्याचा विकास करू, नितीन गडकरींचे पुणेकरांना आश्वासन

by sachinsitapure

पुणे : Nitin Gadkari Pune Sabha | भाजपाचा पुण्यात (Pune BJP) विजय झाला पाहिजे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या रूपाने भाजपाने एक तरूण आणि जनतेसाठी आवाज उठवणारा उमेदवार तुम्हाला दिला आहे. सर्व समाज घटकांचे आणि महायुतीचे त्यांना समर्थन आहे. मी पुणे जिल्ह्यात मेट्रो (Pune Metro), विमानतळ (Pune Lohegaon Airport), रिंगरोड (Pune Ring Road), मुळा-मुठा प्रकल्प (Mula-Mutha River Projects)अशी सर्वात जास्त विकासकामे केली आहेत. एक माझे इंजिन आणि एक मोदींचे इंजिन लावून आपण पुण्याचा विकास करू. मोहोळ यांना जातधर्म पंथाचा विचार न करता विजयी करा, असे आवाहन भाजपा नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात जाहीर प्रचारसभेत केले.

आज पुण्यात (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची सभा झाली. या सभेत नितीन गडकरी यांनी पुण्याच्या विकासाचा रोड मॅपच (Pune Development Road Map) पुणेकरांसमोर मांडला. भाषणाच्या सुरूवातीला नितीन गडकरी यांना दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांची प्रकर्षाने आठवण झाली.

नितीन गडकरी म्हणाले, गिरीश बापट आणि मुक्ता टिळक पहिल्यांदा सभेत नाहीत, त्यांच्या जाण्याने पक्षाचे नुकसान झाले. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. बापट यांनी सातत्याने पुण्याच्या विकासासाठी काम केले. टिळक यांनीसुद्धा शहरासाठी काम केले. यशस्वी महापौर त्यांच्या रूपाने मिळाला. मी दोघांना आदरांजली वाहतो.

गिरीश बापट यांची विशेष आठवण होते. पुण्याची मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न होता. शिरोळे यासाठी मला अनेकदा भेटले. गिरीश बापट खासदार असताना पुण्याच्या या प्रश्नासाठी एक दोन वेळा बैठक घेतली, जागेचा किचकट प्रश्न सोडवला. आता हा प्रश्न सुटला. पुणे विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो सुरू झाली आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, मेट्रोचा प्रश्न सोडवला. आता येथील पुढची कामे कोणालाही न विचारता सुरू करा. नागपूर मेट्रोसाठी देवेंद्र आणि मी ज्यांना जबाबदारी दिली त्यांनाच पुण्याची जाबाबदारी दिली. आता हे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. पुण्याच्या विकासात सर्व आमदार, खासदारांचा सहभाग आहे.

नितीन गडकरी म्हणाले, मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा एक्स्प्रेस वे केला. तेव्हा, आणखी पंचवीस वर्षाचा विचार करून तो बांधायला पाहिजे होता. सध्या वाहतुकीत कोंडीचा प्रश्न आहे. सर्वांना विचारून चांदणीचौकाचा प्रकल्प मी मार्गी लावला. रिंगरोड होणार आहे, बाहेरचे राष्ट्रीय महामार्ग पुण्याला जोडणार आहे, यामुळे वाहतुक कोंडी आणि प्रदुषण कमी होईल. रस्ते अपघात, वाहतुक प्रदुषण कमी होईल.

नितीन गडकरी म्हणाले, पुणे-औरंगाबाद मार्गाचे काम सुरू झाले आहे. दोन तासात हा प्रवास पूर्ण होईल. इलेक्शननंतर हे काम पूर्ण होईल. पुणे-बेंगलोर रस्त्साचे काम सुद्धा इलेक्शन नंतर हाती घेऊ. जिल्ह्यातील मागासलेल्या भागातून हा रस्ता जात असल्याने या भागाचे परिवर्तन होईल.

गडकरी पुढे म्हणाले, पुण्यात या प्रकल्पांसोबत पुणे-अहमदनगर हा रस्ता मी बांधला. नंतर ट्रफिक वाढले. नाशिक-फाटा ते खेड डबल डेकर इलेव्हेटेड हायवे आम्ही बांधणार आहोत. मंजुरी मिळाली की इलेक्शननंतर काम सुरू होईल. पुणे ते शिरूर ६२.२५ किमी इलेव्हेटेड हायवे १२ हजार कोटी रूपयांचा आहे, विविध गावांना जोडणारा हा मार्ग आहे. सहा वर आणि सहा खाली अशा १२ लेनचा हा हायवे आहे.

नितीन गडकरी म्हणाले, कात्रजचा नवीन बोगदा होणार आहे. वेस्टर्न बायपास होणार आहे. घुमकर चौक, नवले पूल, किवळे चौक येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी इलेव्हेटेड हायवे, सव्र्हिस रोड होणार आहे. अध्र्या तासात अंतर कापता येईल. इलेक्शननंतर हे काम होईल.

पश्चिम महाराष्ट्रात २ लाख कोटीची कामे झाली. पंढरपूर, देहू, आळंदी दरवर्षी पालखी मार्गावर यात्रा निघेत. यासाठी १२००० कोटी खर्च करून हा पालखी मार्ग पूर्ण करत आणाला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत उल्लेख केलली झाडे या मार्गावर लावू. यासाठी काम करण्याची मला संधी मिळाली.

गडकरी पुढे म्हणाले, मी ५ लाख कोटीपेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राला दिले. पुणे-कोल्हापूर मार्गाचे विस्तारीकरण सुरू केले आहे. पुणे वेगाने वाढणारी सिटी आहे. मुंबई, नवी मुंबई प्रमाणे भविष्यात पुण्यात नवीन पुणे बनविणे गरजेचे आहे. मुरलीधर मोहोळ यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. या नवीन पुण्यात नवीन विमानतळ बांधावे लागेल. कारण येथील लोकसंख्या, गर्दी वाढत जाणार आहे.

नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, देशाच्या ७५ वर्षात ६० वर्ष काँग्रेसने काम केले. या काळात समस्या वाढल्या, पण १० वर्षात मोदी सरकारने पायाभूत सुविधांमध्ये बदल केला. भारतात कुठेही जा चांगले मार्ग बघायला मिळतील. काश्मिर ते कन्याकुमारी भागातही अनेक मार्ग बांधले.

लडाख लेहच्या पुढे कारगिरलच्या खाली अनेक टनेल बांधले. श्रीनगर आणि जम्मूमध्ये १८ टनेल बांधले आहेत. कटरा एक्स्प्रेस हायवे, संपूर्ण दक्षिण भारताला जोडणारा हा रस्ता आहे. काश्मिर ते कन्याकुमारी हे स्वप्न प्रत्यक्षात यामुळे पुर्ण होईल. याचा फायदा पुणे, मुंबईला देखील होईल. यामुळे पुण्यातील वाहतुक कमी होईल. वाहने परस्पर सुरत मार्गे जातील. इकडे येणार नाहीत.

गडकरी म्हणाले, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आमच्या सरकारने पायाभूत सुविधा वाढवण्यास प्राधान्य दिले. जिथे पाणी, विज, रस्ते असतात तिथे उद्योग, व्यापार वाढतो. गरीबी दूर होते. देशाला सुखी करण्यासाठी जगातील तिसरी अर्थव्यवस्थ करण्यासाठी यास आम्ही प्राधान्य दिले. आज देशातील एक्सपोर्ट तीनपटीने वाढली. कृषी निर्यात तीनपटीने वाढली, भविष्यात आणखी वाढेल. शेतकरी गरीबांचे कल्याण होईल.

नितीन गडकरी यांनी म्हटले की, देशाला पुढे नेण्यासाठी एक्सपोर्ट वाढवले पाहिजे. १६ लाख कोटी रूपये पेट्रोल, डिझेल एक्सपोट करण्यासाठी खर्च करणार आहोत. इंडियन ऑईल इथेनॉलचे पंप तयार करणार आहे. इथेनॉलवर चालणाèया बाईक बजाज, हिरो इत्यादी बनवत आहेत. बजाजने सीएनजी स्कूटर तयार केली आहे. याची सुरूवात केली. इलेक्ट्रिक टू व्हिलर आणि कार, बस पॉप्युलर ठरली आहे.

गडकरी म्हणाले, देशात इलेक्ट्रीक बसस,े कार निर्यात होऊ लागल्यात. चाकणमध्ये इलेक्ट्रिक मर्सिडिज कार तयार होत आहेत. सर्व दृष्टीने ऑटोमोबॉईल रोजगार वाढत आहे. पुणे ऑटोमोबॉईलचे माहेरघर आहे. पुण्यातील डबल डेकर रस्ते, रिंगरोड जनतेचे जिवन सुसह्य करतील.

मुळा-मुठा प्रकल्पातून पुण्याचे सौंदर्य वाढेल. या परिवर्तनाची तुलना काँग्रेसच्या काळाशी केली तर आम्ही दहा वर्षात त्यांच्या तीनपट काम केले. सर्व समृद्ध झाले पाहिजेत. ४७ साली तीन विचारधारा देशात होत्या. सर्व जागातून कम्युनिस्ट राजवट संपत आहे.

पुण्यात मोठे समाजवादी नेते होते, ते ही मागे पडले. स्वतंत्र पार्टी पण संपली. भारताच्या विकासासाठी येणारे सरकार कोणत्या विचारांवर चालणारे आहे हे महत्वाचे आहे. दिनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावर हे सरकार चालले पाहिजे. गोरगरिबांना परमेश्वर मानून दरिद्री नारायणांना परमेश्वर समजून काम करत राहू, हेच पं. दिनदयाळ यांचे विचार आमचे आहे.

पुढील दहा वर्षात देशात गरीबी राहणार नाही. देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल. काँग्रेसवाल्यांकडे विकासाची चर्चा करण्यास आधार नाही. भाजपा ४०० जागा का म्हणते, मी लॉ चा विद्यार्थी आहे, घटनेची मुलभूत तत्व बदलता येणार नाहीत. कोणीही पंतप्रधान आणि राष्ट्रपती येऊद्यात, घटना बदलता येणार नाही. काँग्रेसवाले दिशाभूल करत आहेत.

घटनेच्या कलमांमध्ये दुरूस्ती करता येते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी घटनेत मोठी मोडतोड केली. ८० वेळा काँग्रेसने घटनेत मोडतोड केली. संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही. हे जातीत भांडणं लावत आहेत.

नितीन गडकरी म्हणाले, नागपुरमध्ये मी यावेळी लाखो मतांनी विजयी होणार आहे. मी जात-पात, पंथ, धर्म मानत नाही. एकाच भावात सर्वांना गॅस पेट्रोल मिळते. जे पुढारी आपल्या कामाने निवडूण येत नाहीत, ते जातीच्या ढाली पुढे करतात. मी या भानगडीत पडत नाही. मला सर्व जातीपातींनी मत दिले. या समाजातील जातीयता नष्ट झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. माझ्या कार्यालयात शिवाजी महाराजांचे छायाचित्र आहे. आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा जाणता राजा आहे.

नितीन गडकरी म्हणाले, सेक्युलर म्हणजे सर्वधर्म समभाव. हा सर्वधर्म समभाव छत्रपती शिवाजीराजांनी या देशात कायम ठेवला. एकही मशिद तोडली नाही. शत्रूंच्या आयाबहिणींची ओटी भरली, त्यांना त्यांच्या घरी सोडले. काँग्रेसचा सर्वधर्म समभाव खोटा आहे.

या काँग्रेसवाल्यांच्या भाषेतील सेक्युलरवाद खोटा आहे. बाबासाहेबांनी सांगितलेली सामाजिक, आर्थिक समता प्रस्तापित करून, महात्मा फुले राजर्षी शाहुंनी सांगितलेली समता प्रस्तापित करणे हाच आमचा उद्देश आहे, असे गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले, आठ वर्षापासून नागपुरमधील टॉयलेटचे पाणी आम्ही विकतो. वीज प्रकल्पासाठी ते वापराले जाते. तीन कोटी मिळातात. चोवीस तास पाणी नागपुरकरांना मिळत आहे. कचèयातून धातू बाहेर काढून याच्या हायड्रोजनचा प्लांट टाकणार आहोत. ट्रक, बसेस, विमानं सर्व हायड्रोजनवर चालले पाहिजे. शेतकरी उर्जा दाता, इंधन दाता झाला पाहिजे. पानिपतमध्ये एक मोठा प्रकल्प तयार केला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, इंटरनॅशनल विमानं आमच्या येथे स्वस्त इंधन घेण्यासाठी थांबली पाहिजेत. हवाई इंधन तयार करणारा हा देश असेल. मी स्वप्न दाखवणारा नेता नाही, मी बोलतो ते करतो. हा देश बदलणार आहे. गरिबी बदलणार आहे. स्मार्ट सिटी नव्हे स्मार्ट व्हिलेज बनणार आहेत. हा देश विश्वगुरू बनणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले, साहित्य, संस्कृती, कला याचा आधार घेऊन आपला देश विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही. हे बनविण्यासाठी योग्य नेतृत्व, निती असायला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे मिशन राबवण्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. दहा वर्षात झालेले काम ट्रेलर होते, असली फिल्म बाकी आहे, असे गडकरी म्हणाले.

तर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, गडकरी साहेबांचे आभार मानतो, मला आशीर्वाद देण्यासाठी ते आले. ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या भविष्याची ही निवडणूक आहे. म्हणून पुणेकरांनी पाठींबा द्यावा. लोकांचा भरभरून समर्थन मिळत आहे.

मोहोळ म्हणाले, केंद्र सरकारमुळे अनेक प्रकल्प पुण्यात झाले, म्हणून लोकांचे समर्थन आहे. चारशे ई बसेसे केंद्र सरकारकडून मिळाल्या. नदी प्रकल्पासाठी पैसे मिळाले, मोदी सरकारने पुण्याला भरपूर दिले.

तुमच्या भाषणातून भविष्यात आणखी काय होणार हे समजले. गडकरी साहेबांनी पुण्याचा व्हिजन मॅप दिला. पुढच्या काळात भविष्याचे व्हिजन जे गडकरी साहेबांनी मांडले त्यासाठी काम करेन असे पुणेकरांना आश्वस्त करतो. विकसित भारतासाठी मोदी सरकारशिवाय पर्याय नाही, असे मोहोळ म्हणाले.

या जाहीर सभेला चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, धीरज घाटे, दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, हेमंत रासने, स्वरदा बापट, रुपाली पाटील, किरण साळी, अ‍ॅड. मंदार जोशी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Murlidhar Mohol | भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना राजपुत समाज सेवा विकास मंचचा जाहीर पाठिंबा

Related Posts