IMPIMP

Nitin Landge Bribe Case | ‘त्या’ 16 जणांची चौकशी होत नाही तोपर्यंत आरोपींना जामीन देवू नये ! जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला, जाणून घ्या

by nagesh
Nitin Landge Bribe Case | Chairman of Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Adv. The results of the bail applications of five persons, including Nitin Landage, were reserved till August 30

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Nitin Landge Bribe Case | होर्डिंगच्या टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी 10 लाच मागितल्याप्रकरणात ‘त्या’ 16 जणांची नावे जवळपास स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे त्या 16 लोकांची चौकशी होत नाहीत, तोपर्यंत अटक आरोपींना जामीन देण्यात येवू नये. कारण तोपर्यंत तपास पुर्ण होणार नाही, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील रमेश घोरपडे (Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी शुक्रवारी केला. या गुन्ह्यात अटक (Nitin Landge Bribe Case) केलेल्या पाचही आरोपींच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

जामीन अर्जावर सोमवारी (ता. 30) निकाल देण्यात येणार आहे. या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे PCMC standing committee chairman adv nitin landge (वय 50, रा. भोसरी),
त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय 56, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे
(वय 50, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (वय 51, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया वय 38, रा. धर्मराजनगर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायलयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर लांडगे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रताप परदेशी (adv pratap pardeshi)आणि
अ‍ॅड. गोरक्षनाथ काळे (adv gorakshnath kale) यांनी तर उर्वरीत आरोपींतर्फे अ‍ॅड. विपुल दुशिंग (Add. Vipul Dushing), अ‍ॅड. कीर्ती गुजर (Adv. Kirti Gujar), अ‍ॅड. संजय दळवी (Adv. Sanjay Dalvi) यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला आहे.
त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या अर्जाला ॲड. घोरपडे यांनी विरोध केला. गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर असून तपासा दरम्यान ते 16 जण कोण आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्या 16 जणांकडे चौकशी करणे गरजेचे आहे.
त्यांच्याकडील चौकशी होत नाही तोपर्यंत या पाच जणांना जामीनावर सोडू नये.
गुन्ह्याच्या तपासी अधिका-यांना तपास करण्यासाठी पुर्ण संधी आणि वेळा दिला गेला पाहिजे.
आरोपींनी सर्वांनी एकत्र मिळून काम केले आहे. त्यामुळे गुन्ह्यात कोणाचा सहभाग नाही, असे म्हणता येणार नाही. जर या पाच जणांना जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या प्रकरणाचा समाजावर काय परिणाम होईल याचा देखील विचार केला जावा.
त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. घोरपडे यांनी केला.
दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत या जामीन अर्जावरील निकाल 30 ऑगस्टपर्यंत राखून ठेवला आहे.

पिंगळे याने तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैसै वर सोळा जणांना द्यावे लागतात असे सांगितले आहे. गुन्ह्याच्या पडताळणीमध्ये ते 16 कोण आहेत हे स्पष्ट झाले आहे.
त्यांकडे गुन्ह्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सांगितले आहे.

 

Web Title : Nitin Landge Bribe Case | Chairman of Pimpri-Chinchwad Municipal Corporation Standing Committee Adv. The results of the bail applications of five persons, including Nitin Landage, were reserved till August 30

 

हे देखील वाचा :

Pune Accident | भाजीपाला घेऊन जाणार्‍या रिक्षाचालकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

Mukesh Ambanis Corona Vaccine | मुकेश अंबानी यांच्या कोरोना व्हॅक्सीनला मिळाली क्लिनिक ट्रायलची मंजूरी

Pune Crime | बांधकाम व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्याने लाखोची फसवणूक, बांधकाम व्यावसायिकावर FIR

 

Related Posts