IMPIMP

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द

by sachinsitapure

पुणे : CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi | बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) महायुतीच्या उमेदवार (Mahayuti Candidate) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रचारसभा भोर तालुक्यातील नसरापूर येथे झाली. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाविकास विकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. मविआच्या काळातच सुप्रिम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द झाले, तसेच आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मविआ काळात सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झाले. आघाडीच्या हातात संधी असताना मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, उलट मराठा समाजाला वंचित ठेवले. महायुतीने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे दहा टक्के आरक्षण दिले. उलट त्याच्यावर यांनी टिका केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशात आणि परदेशात भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते. ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नसून विकासाची आहे. देशाची प्रगती करणारी ही निवडणूक आहे. काही लोक निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका.

तर अजित पवार यांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, भोरमधील उत्रौलीमध्ये ९३ साली एमआयडीसीचे शिक्के पडले तरी आजपर्यंत एमआयडीसी झाली नाही. यांनी तीस वर्ष काय केले? मागच्या वेळेस खासदार म्हणल्या एमआयडीसी नाही केली तर मते मागायला येणार नाही. तरीही परत येतात.

अजित पवार म्हणाले, तुम्ही आत्तापर्यंत ज्यांना खासदार केले त्यांनी भोर, वेल्हा, मुळशीसाठी आत्तापर्यंत काये केले? भोरची लोकसंख्या का कमी होतेय याचा कधी विचार केला का? इथे नसबंदी झाली आहे म्हणून लोकसंख्या कमी झालेली नाही तर रोजगार नाही म्हणून कमी झाली आहे.

ते पुढे म्हणाले, पर्यटनाचा विकास झाला नाही. या ठिकाणच्या राजगड कारखान्यात उसाला तेवीसशे रुपये टनाला देऊन कसे होणार? यावेळेस महायुतीच्या अनेक पक्षांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

येथील खासदारांनी काय कामे केली ते सांगावे? नुसते भाषण करून काय होते? भोर, वेल्ह्याची काय अवस्था झाली आहे. सत्ता असताना विकास करायला काय झाले होते, असा सवाल पवार यांनी सुप्रिया सुळे यांना केला.

या सभेला विजय शिवतारे, नीलम ताई गोऱ्हे, कुलदीप कोंडे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, रमेश कोंडे, शरद ढमाले, जीवन कोंडे, बाळासाहेब चांदेरे, अमोल पांगारे, बाळासाहेब गरुड, प्रताप शिळीमकर आदी उपस्थित होते.

Ajit Pawar Vs Sharad Pawar | एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय : अजित पवार

Related Posts