IMPIMP

Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक, सायबर सेलकडून दोघांना अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Cyber Cell | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) करण्यास सांगून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Lure Of More Profit) फसवणूक (Cheating Fraud Case) करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सतीश सुरेश बुंदेले Satish Suresh Bundele (रा. बी-11, मोरेश्वर विहार, गोलांडे इस्टेट, लिंक रोड, गावडे पंपाजवळ, चिंचवड), परेश गुलाब बिरदवडे Paresh Gulab Birdawade (रा. बी-7, सृष्टी अपार्टमेंट, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सायबर सेलचे पोलीस अंमलदार सुरज शिंदे यांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दररोज वेगवेगळ्या व्यक्तींना बँकेत घेऊन जात असून तो त्यांचे खाते सुरु करुन घेत आहे. त्याच्यावर संशय आल्याने पथकाने तपास केला असता संशयित व्यक्तीने सिटी युनियन बँकेत खाते उघडले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बँक खाते धारकाची माहिती घेतली असता सतीश बुंदेले या नावाने खाते उघडल्याचे समजले. त्यानुसार सतीश बुंदेले याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा मित्र परेश बिरदवडे याने बँकेत खाते सुरु करण्यास सांगितले होते. खाते सुरु करण्यासाठी त्याने ऑनलाइन पैसे घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी परेश बिरदवडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी कर्जत येथील एका व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवले. त्यातून त्या व्यक्तीची 11 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याने त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुन्ह्याचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोलीस अंमलदार सुरज शिंदे, अतुल लोखंडे करीत होते. त्यांनी तांत्रिक तपसा केला असता आरोपी यांनी वेगवेगळ्या बँकेत सायबर फसवणूक करण्यासाठी अकाउंट काढल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी काढलेल्या बँक खात्यांविरुद्ध देशभरातून 40 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे (Sandeep Doiphode DCP), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे (ACP Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सुरज शिंदे यांच्या पथकाने केली.

Related Posts