IMPIMP

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवडमधील पवार, राजपुत, ढमाले टोळीवर पोलीस आयुक्तांची ‘मोक्का’ कारवाई

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. शररिराविरुद्ध, मालाविरुद्ध गुन्हे करणारे तसेच खंडणी मागणारे व दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी चालु वर्षात 16 सराईत गुन्हेगारी टोळ्यांमधील 87 आरोपींवर मोक्का कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील पवार, राजपुत आणि ढमाले टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. या तीन टोळीतील 20 गुन्हेगारांवर मोक्का कारवाई केली आहे. या गुन्हेगारांनी चाकण, हिंजवडी आणि वाकड परिसरात गंभीर गुन्हे केले असून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवार टोळीतील पाच जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये टोळी प्रमुख राहुल संजय पवार (वय-33 रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय अरुण गायकवाड (वय-24 रा. भोसले वस्ती, म्हाळुंगे इंगळे), अमर नामदेव शिंदे (वय-32 रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अभिजीत उर्फ अभि चिंतामण मराठे (रा. कोथरुड, पुणे), आशु उर्फ आसिफ हैदर हापसी (वय-25 रा. कासारवाडी, ता. हवेली) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांवर 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. चाकण पोलीस ठाण्यात दाखल अलेल्या आयपीसी 307, 120ब, 504, 506, 34 या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुत टोळीचा प्रमुख सचिन तानाजी राजपुत (वय-26 रा. कासार आंबोली, ता. मुळशी), अरुण कैलास राजपुत, राजेश हरिश्चंद्र राजपुत, बालाजी हरिश्चंद्र राजपुत यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढमाले टोळीचा प्रमुख अभिजीत बाजीराव ढमाले (रा. ढमाले चाळ, जुनी सांगवी), ऋतिक दिलीप चव्हाण (वय-22 रा. महादेव आळी, जुनी सांगवी), प्रेम प्रकाश मोरे (वय-19 रा. जुनी सांगवी), ओमकार पांडुरंग शेंडगे (वय-22 रा. दापोडी), दिपक लुंडा कोकाटे (वय-21 रा. पिंपळे गुरव), रोशन मुरलीधर सोळंकी (वय-23 रा. जुनी सांगवी), कार्तिक चव्हाण, कमलेश पठारे, अनिकेत कांबळे, गणेश ढमाले, निलेश मुदलीयार यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई केली असून या टोळीवर 17 गुन्हे दाखल आहेत.

या तिनही टोळीतील गुन्हेगारांनी चाकण, एमआयडीसी भोसरी, रावेत, निगडी, हिंजवडी, वाकड, सांगवी, भोसरी, कोथरुड, पौड, रोहा, कोलाड, रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, कट रचुन खुन करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणी, अपहरण, तोडफोड, जीवे मारण्याची धमकी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत. दाखल गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांना सादर करण्यात आला होता. कागदपत्रांची पडताळणी करुन गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचे आदेश देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त बापु बांगर, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटोळे, पोलीस अंमलदार पारवे, उभे, झानंकर, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.

Related Posts