IMPIMP

Pisoli Kondhwa Pune Crime News | पुणे : पार्किंगच्या वादातून कारची तोडफोड करुन महिलेला धमकी

by sachinsitapure

पुणे :  – Pisoli Kondhwa Pune Crime News | पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Abuse) करुन धमकी दिल्याची घटना पिसोळी परिसरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.26) दुपारी दीडच्या सुमारास पिसोळी येथील एका सोसायटीच्या पार्कींगमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 40 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाबासाहेब देशमुख व आकाश देशमुख (रा. आरव्ही इन्प्रेरिया, पिसोळी) यांच्यावर आयपीसी 509, 506, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहत असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी त्यांची अल्टो कार सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावली होती. आरोपींनी कारच्या काचा फोडून नुकसान केले.

कारची काच फोडल्या बाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी आकाश याने त्यांच्या पतीला आरेरावी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी पार्कींगच्या जागेची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी राहुल आणि आकाश यांनी सार्वजनिक जागेत गोंधळ घालून महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्य़ादी यांच्या पतीला तु सोसायटीच्या बाहेर भेट मी तुला दाखवतो अशी धमकी दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

भांडण मिटवण्याच्या बहाण्याने विनयभंग

पुणे : पती-पत्नीचे भांडण सुरु असताना ते सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने महिलेसोबत असभ्य बोलून विनयभंग केला (Molestation Case). तसेच महिला काम करत असलेल्या ठिकाणी येऊन तिच्यासोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन योगेश दशरथ खुटवड (वय-30 रा. कोडीत ता. पुरंदर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts