IMPIMP

Pubs In Pune After Porsche Accident Case | पोर्श अपघातानंतर पब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पबमधील सद्यस्थिती

by sachinsitapure

पुणे :  – Pubs In Pune After Porsche Accident Case | पुण्यात मोठ्या प्रमाणात पब क्लब्स आहे. हे पब्स आणि क्लब्स दररोज गजबजलेले असतात. परंतु, कल्याणी नगर भागात पोर्श कारच्या अपघातानंतर पुण्यातील पब आणि क्लब मधील चित्र बदललं आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पबमध्ये मद्यापान करुन आलिशान पोर्श गाडी चालवून दोन तरुणांना उडवले. यानंतर पुण्यातील पब संस्कृतीवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला. तसेच पब मध्ये अल्पवयीन मुलांना मद्य दिले जात असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने अशा पबवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

https://x.com/chiragbarjatyaa/status/1794992582554218985?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1794992582554218985%7Ctwgr%5E4ab3a765f9c1da0d306b186a19850e083568e5d4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fpune%2Fpune-pubs-are-empty-after-porsche-accident-as-25-years-drinking-law-in-maharashtra-chirag-barjatya-asc-95-4397310%2F

प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर शहरातील अनेक पब आणि क्लब चालकांना जाग आली आहे. त्यांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील नवउद्योजक चिराग बडजात्या यांनी एक्स वर व्हिडीओ शेअर केला आहे आणि म्हटले की, पोर्श अपघातानंतर पुण्यातील पब रिकामे दिसू लागले आहेत. या पब्स, क्लब्समध्ये हायस्कूलसह महाविद्यालयीन तरुणांना प्रवेश दिला जात नाही. महाराष्ट्रात मद्यापान करण्यासाठी 25 हे कायदेशीर वय आहे. पोर्श कारच्या अपघातानंतर या नियमांचे पालन होत नसलेल्या पब्स, क्लब्स आणि बारवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 25 पेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना पुण्यातील पब, क्लब किंवा बारमध्ये प्रवेश दिला जात नाही. परिणामी हे पब आता ओसाड पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

चिराग यांनी म्हटले की, पुण्यातील क्लब रिकामे आहेत. खरंतर जे लोक क्लब्स आणि पब्समध्ये गर्दी करतात त्याच मुलांना येथे प्रवेश दिला जात नाही. तसेच या क्लब्समधील बार परिसर वगळता इतर ठिकाणी मद्यपानाची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. 40-50 वर्षांच्या लोकांनाही या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र मागितले जात आहे.

चिराग यांनी केलेल्या पोस्टला अनेक तरुणांनी कमेंट केल्या आहेत. काही तरुणांनी चिराग यांच्या दाव्याची पुष्टी केली आहे. तर काहींनी तक्रारीचा सूर आवळला आहे. एका तरुणाने कमेंट केली की, 25 पेक्षा कमी वय असल्यामुळे माझ्या एका मैत्रिणीला एका प्रसिद्ध क्लबने प्रवेश नाकारला. अनेकांना या निर्णयाचे स्वागत केले तर एका युजरने काही दिवसांत ही परिस्थिती पूर्ववत होईल अशी कमेंट केली आहे.

Related Posts