IMPIMP

Pune BJP On Kalyani Nagar Accident | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात भाजप आक्रमक, रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब व बारवर कारवाई करण्याची मागणी

by sachinsitapure

पुणे : – Pune BJP On Kalyani Nagar Accident | पुण्यातल्या कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटारसायकलला धडक दिली. ज्यामध्ये दोन आयटी अभियंता असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर भाजप आक्रमक झाली असून पुण्यात सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब, बार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol (प्रदेश सरचिटणीस, भाजपा) यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. (Pune BJP On Pubs)

संपूर्ण राज्यात पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून पुणे शहराच्या संस्कृतिला धक्का लागणारे प्रकार सातत्यान समोर येत आहेत. त्यामध्ये नाईट लाईफ संस्कृती कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. या संस्कृतीमुळे अनेक तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. मद्यसेवन केलेली अनेक तरुण-तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास आपली वाहने सुसाट वेगाने चालवत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे, धीरज घाटे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

धीरज घाटे यांनी दिलेल्या निवेदनात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत.

1. पुण्यात सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या पब, बार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
2. पबमध्ये सुरु असणाऱ्या पार्ट्यांसाठी डीजेवर लावण्यात येणारी गाणी ही अतिशय अश्लील पद्धतीची असतात. त्यामुळे यावर लगाम घातला पाहिजे.
3. मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे.
4. कोरेगाव पार्क ते विमाननगर, मुंढवा यांसह पुणे शहराच्या आसपासच्या अनेक परिसरातील पब हे रात्री 8 नंतर सुरु होतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्ट्यांच्या नावाखाली हुल्लडबाजी करत असतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब चालकांना वेळेचे बंधन घालावे.
5. रात्री बदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
6. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीवर जामीनपात्र कलमे लावून, त्याला एकप्रकारे अभय दिले असल्याची भावना पुणेकरांमधून व्यक्त होत आहे. सदर घटना अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे आरोपी प्रति कोणतीही दया दाखवणे योग्य नाही. यातून पोलिसांच्या प्रतिमेला ही धक्का लागत आहे. त्यामुळे आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमांचा पुनर्विचार करुन, त्यास कठोर शासन व्हावे. जेणेकरुन भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
7. पुण्यात सुरु असलेल्या नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा विचार देखील आवश्यक आहे. कारण नाईट लाईफ मध्ये सहभागी तरुण-तरुणी नशेच्या अमलाखाली गल्याने, त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा हे तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात. अनेक वेळा या तरुणी उशिरा रात्री ‘पार्टी’ संपवून घरी परतण्यासाठी एकट्याच रिक्षा किंवा कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असतात. या सर्व प्रकारांमुळे या तरुण-तरुणींच्या जीवाबरोबरच इतर सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असून या प्रकारामुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने कडक पावले उचलली पाहिजेत.
8. पब व बारमालक हॉटेल परवाना मिळवताना महापालिकेत प्रस्ताव दाखल करतेवेळी अतिशय छोटे बांधकाम दाखवतात. प्रत्यक्षात परवाना मिळाल्यानंतर अनधिकृतपणे पक्के बांधकाम करुन अथवा शेड टाकून पब व हॉटेलचे आकारमान वाढवले जाते. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
9. शहरातील अनेक भागात पानटपऱ्या, आईस्क्रीम पार्लर व चायनीज गाडे दिवसभरानंतर रात्रीही जोमात सुरु असतात. काही टपरीचालक वेळेत बंद करतात. मात्र काहीजण रात्री चक्क बारा वाजेपर्यंत आपले दुकान थाटून बसतात. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे.

यावेळी अजय भोसले, योगेश टिळेकर, गणेश बीडकर, लतीफ शेख, डॅा. सिद्धार्थ धेंडे, प्रदीप देशमुख, रुपाली पाटील-ठोंबरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, हर्षदा फरांदे, संदीप खर्डेकर, दीपक पोटे, सुशील मेंगडे, राजेश येनपुरे, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडले आहे. त्यात नाईट-लाईफ कारणीभूत असल्याचे समोर येत आहेत. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होताना दिसत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही केली आहे’

– मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस, भाजपा

Kondhwa Pune Crime News | पुणे : धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून, कोंढवा परिसरातील घटना

Related Posts