IMPIMP

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

by nagesh
Pune Corporation | 'Cold War' between Pune Municipal Corporation Standing Committee Chairman and Commissioner is still going on!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Corporation | ‘वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकाची 100 टक्के अंमलबजावणी करा’ हा स्थायी समितीचा आदेश झुगारल्याने स्थायी समितीने आयुक्तांचा निषेध केल्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महापालिकेतील (Pune Corporation) कार्यलयात असुनही महापालिका आयुक्तांनी आज स्थायी समितीच्या बैठकीकडे (standing committee meeting) पाठ फिरवल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

स्थायी समितीच्या वतीने उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात असून यावर्षी अंदाजपत्रका एवढे उत्पन्न मिळेल असा दावा करण्यात आला आहे. आगामी निवडणूक आणि अनलॉक मुळे कोरोनामुळे सुरू केलेली वित्तीय समिती बरखास्त करून अंदाजपत्रकातील ‘स’ यादीतील 100 टक्के कामे करावीत असा आदेश सुमारे सव्वा महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्षांनी दिला होता. परंतु उत्पन्न वाढीच्या योजनांची अंमलबजावणी करून प्रत्येक्ष उत्पन्न वाढ झाल्याशिवाय स्थायी समितीच्या (standing committee chairman) आदेशा नुसार काम करणे शक्य नसल्याचे आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी स्पष्ट केले होते.

आयुक्तांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पुणे मनपाच्या (Pune Corporation) स्थायी समिती अध्यक्षांनी (standing committee chairman) आयुक्तांचा निषेध करून बैठक तहकूब केली होती. यानंतर मागील आठवड्यात बैठक झाली. पण या बैठकीला आयुक्त आले नाहीत. तसेच आज झालेल्या बैठकीकडे ही आयुक्त विक्रम कुमार यांनी पाठ फिरवली. विशेष असे की आज दुपारी स्थायी समितीची बैठक सुरू असताना आयुक्त त्यांच्या कार्यालयातच उपस्थित होते.

यानिम्मिताने स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यांच्यामधील कोल्ड वॉर अद्याप सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

Web Title : Pune Corporation | ‘Cold War’ between Pune Municipal Corporation Standing Committee Chairman and Commissioner is still going on!

 

हे देखील वाचा :

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

Post Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts