IMPIMP

Pune Court | मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

by nagesh
Pune Court | Mangaldas Bandal’s bail rejected

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Court | जमीन गहाण ठेवली असतानाही तिची परस्पर विक्री केल्याप्रकरणात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (mangaldas bandal) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून (Pune Court) लावला. सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

 

बांदल यांनीच नाव येऊ नये, यासाठी दोघांना हाताशी धरून अधिकाऱ्यांच्या मदतीने कर्ज घेऊन पैसे स्वत:चे फायद्याकरीता वापरले. हप्ते न भरता त्या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या प्रकरणात बांदलसह रुपेंदरकौर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघेही, रा. कोंढवा), विजय दिनकर धुमाळ (पिंपळे धुमाळ, ता. शिरूर) आणि गोरख महादेव दोरगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 19 जनेवारी 2015 मध्ये घडलेल्या घटनेबाबत बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. रुपेंदरकौर आणि हरचरणपाल या दोघांच्या नावावर हे कर्ज काढण्यात आले होते. ही जमीन विजय धुमाळ याला विक्री करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. त्यावेळी दोन्ही नंदा यांनी हा व्यवहार बांदल यांनी केला असल्याचे सांगितले आहे. ही जमीन बांदल याने धमकावून मालक सुरेश शिंदे यांना विकण्यास लावली.

 

व्यवहार 1 कोटी 40 लाख रुपयांचा ठरला असताना, त्यांना केवळ 70 लाख रुपये देण्यात आले
आहेत. खुनशी प्रवृत्तीचा आहे. त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन (Shikrapur Police Station) 4 गुन्हे तपासावर आहेत. पूर्वी सात गुन्हे दाखल होते. त्याची शिक्रापूर परिसरात दहशत
आहे. जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्याची
मागणी अ‍ॅड.. राजेश कावेडीया (Adv. Rajesh Kavedia) यांनी दिली. जमीन विकत घेण्यासाठी
2 कोटी 10 लाख रुपयांचे वडगावशेरी येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून कर्ज घेतले
होते. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. ए. खटावकर (Shikrapur police station PSI A. A. Khadavkar) या गुन्ह्याचा तपास करत आहे.

 

Web Title : Pune Court | Mangaldas Bandal’s bail rejected

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’ ! येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतनं पाठवली राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी, दिल्या वसुलीसाठी सूचना; पोलिस तपास सुरू

Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime | हातगाडी लावण्याच्या कारणावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

 

Related Posts