IMPIMP

Pune Crime | अबब ! पुण्यात चक्क वार्षिक 240 % व्याजदर; व्याजाच्या नावाखाली 12 लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

by nagesh
Pune Crime | Ransom demanded for delivery of household goods to Mumbai Crimes against owners of Sun Life Packers & Movers and Dhareshwar Packers & Movers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | महिना १५ ते २० टक्के व्याजावर कर्ज देऊन त्यावर दररोज १० हजार रुपये दंडाच्या नावाखाली खंडणी (Ransom) उकळण्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pune) अशा सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

विनोद राम शिंदे Vinod Ram Shinde (वय ५६, रा. रास्ता पेठ) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी पियुष शहा (Piyush Shah) यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष शहा यांनी सावकार शिंदे याच्याकडून जून २०२० मध्ये २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यावर शिंदे याने प्रति महा १५ ते २० टक्के दराने व्याज लावले होते. शहा यांनी जून २०२० ते सप्टेबर २०२१ पर्यंत रोख व गुगलपेद्वारे व्याजापोटी २ लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर शहा हे हप्ता देऊ शकले नाही. त्यामुळे शिंदे याने शहा यांना शिवीगाळ व दमदाटी करुन सप्टेबर २०२१ पासून आतापर्यंत प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये व २ हजार रुपये दंड असा सर्व मिळून १२ लाख रुपयांची मागणी (Pune Crime) केली. शहा यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जाची तपासणी केल्यावर शिंदे याने खंडणी मागितल्याचे समोर आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली. अधिक तपासासाठी त्याला समर्थ पोलिसांच्या (Samarth police station) हवाली केले आहे.

 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे यांनी केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | 240% annual interest rate in Pune; A moneylender who demanded a ransom of Rs 12 lakh in the name of interest moneylender arrested by anti extortion cell of pune police crime branch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

Gold Price Today | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! आजही सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली; जाणून घ्या

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा, कोर्टाकडून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

 

Related Posts