IMPIMP

Pune Crime | पालघनचा धाक दाखवून उकळली खंडणी; पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार, दरोड्याचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुरेसे शिक्षण नाही, त्यामुळे नोकरी नाही, घरची गरीबी, त्यामुळे जगण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना गल्ली बोळातील गुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे. गल्ली बोळातील या भाईगिरी करणार्‍यांचा व्यावसायिकांना वाढता त्रास होत आहे. कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील (MG Road Camp Pune) कपडे विक्रेत्याला एका टोळक्याने पालघनचा धाक दाखवून खिशातील ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

लष्कर पोलिसांनी शानु शेख (वय २०) व इतर चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सद्याम असिमुद्दीन हुसेन Saddam Asimuddin Hussain (वय २३, रा. भवानी पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. हुसेन हे महात्मा गांधी रोडवरील सोरगामा यादुकानासमोर फुटपाथवर कपडे विक्री करतात. ७ डिसेबर रोजी साडेअकरा वाजता ते कपडे विक्री करत असताना शानु शेख व त्याचे ४ साथीदार तेथे आले.

 

त्यांनी हुसेन यांना फुटपाथवर धंदा लावण्याकरीता हप्ता मागितला. तेव्हा हुसेन यांनी त्याला नकार दिला.
त्यावर त्यांनी शिवीगाळ करुन पालघनचा धाक दाखवून हुसेन यांच्या पँटच्या खिशातील
अंदाजे ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने (Pune Crime) काढून घेऊन निघून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर (API Shilimkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | robbery by knife on MG Road Camp Pune case registered in lashkar police station

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! आजही सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली; जाणून घ्या

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलासा, कोर्टाकडून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 789 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts