IMPIMP

Pune Crime | वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांवर कोयत्याने वार; विश्रामबाग पोलिसांकडून 5 जणांना अटक

by nagesh
Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आदल्या दिवशी झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर व त्याच्या भावावर कोयत्याने वार (Pune Crime) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) पाच जणांना अटक केली आहे.

दादया ऊर्फ प्रितेश अनिल कानगुडे (वय २३), बल्या ऊर्फ अक्षय चंद्रकांत शेंडकर (वय २८), जित्या ऊर्फ जितेंद्र शेंडकर (वय २८), रोहन मनोहर तांदळे (वय २२, रा. दांडेकर पुल) आणि अनिकेत सचिन दोडके (वय १८, रा. दांडेकर पुल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी गौरव युवराज खाडे (वय २३, रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (गु. र. नं. १३७/२१) फिर्यादी (Pune Crime) दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे असून त्यांच्यात १ नोव्हेबर रोजी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी गौरव व त्यांचा मोठा भाऊ रोहित हे मध्यरात्री साडेबारा वाजता लोकमान्यनगर येथील ना. सी. फडके चौकाकडून मांगीरबाबा चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर आले होते. तेथे आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावाला शिवीगाळ करुन आता याला जिवंत सोडायचे नाही, असे बोलून फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला. फिर्यादीने तो हुकवला. त्यामुळे कोयता त्यांच्या पायाच्या नडगीला लागून ते जखमी केले. त्यांच्या भावाचे डोक्यात मध्यभागी कोयता मारुन बांबुने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कोलंबिकर तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | attack on those who went to settle disputes; Vishrambag police arrested 5 people

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी; शरीरसुखाची मागणी करणार्‍या फोनवरुन प्रकार उघडकीस

Modi Government | खुशखबर ! शेतकरी आता विना गॅरंटी घेऊ शकतील 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

Dengue | कोणताही ताप डेंग्यू आहे किंवा नाही? डॉक्टर्स ‘या’ टेस्टद्वारे करतात निदान, तुम्ही सुद्धा जाणून घ्या

 

Related Posts