IMPIMP

Pune Crime | मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या डोक्यात पालघनने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न काळेपडळ येथे घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) दोघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी संजु लक्ष्मण पटणपल्लु (वय ४०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार काळेपडळ येथील संयोगे कॉलनीमधील यान आरटीओ मैदानात गुरुवारी सायंकाळी ४ ते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा यश हा क्रिकेट खेळत असताना विकास जाधव व रितेश चाळके यांनी यशला
“तू शिवी का दिली” असे म्हणून त्याला व त्याचा मित्र रोहित ठोकळ यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली.
यश हा ठोकळ याच्या मोटारसायकलवरुन परत जात असताना त्या दोघांनी मोटारसायकलची हेडलाई फोडून नुकसान केले.

 

या घटनेची माहिती मिळाल्यावर फिर्यादी यांनी आरोपींना बोलावून घेतले. माझ्या मुलाना का मारले असा जाब विचारला.
तेव्हा आरोपींनी फिर्यादी यांना चापट मारली. हे पाहून त्यांचा मित्र महादेव सकाटे याने विकास जाधव याला धरले.
तेव्हा तो खाली पडला. त्याने सकाटे याच्याबरोबर झटापट करुन पालघनने त्याच्यावर वार केला.
सकाटे हा पळून जाऊ लागला असताना खाली पडला. हे पाहून जाधव याने त्याच्यावर पालघनने वार केला.
त्याने वार चुकविण्यासाठी हात पुढे केल्याने हातावर वार झाला. तो गंभीर जखमी झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, जाधव याने फिर्यादी याच्या अंगावर धावत जाऊन “तु आमची पोलिसात तक्रार करणार आहेस”
असे म्हणून शिवीगाळ करुन “तुला आता संपवूनच टाकतो,” असे म्हणत धमकी दिली.
तिेश चाळके याने पालघन घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात दोन वार केले.
तसेच त्यांच्या उजव्या खांद्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला असून पोलीस उपनिरीक्षक वाडकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Attempt to murder in wanwadi police station area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कंपनीत सोबत काम करणार्‍या तरूणीवर जडला जीव, जेवणासाठी घरी बोलावून केली भानगड अन्…

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा ! भाडे कमी होण्यासह सुखकर होईल रेल्वे प्रवास

BSNL | स्वस्तात मस्त प्लान ! 36 रुपयांमध्ये डेटा, कॉलसह आणखी काही सुविधा, जाणून घ्या

 

Related Posts