IMPIMP

Pune Crime | ‘मोमोज’चे पैसे मागितल्याने गुंडांचा कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | मोमोज खाऊन बिल न देता तसेच जाणार्‍यांकडे पैसे मागितल्यावर याची तर आता विकेट टाकतो, असे म्हणून विक्रेता व त्याच्या मामावर कोयत्याने वार करुन टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) फैजाज शेख आणि प्रसाद आंबेकर (रा. ससाणेनगर, हडपसर) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार स्पर्श शुक्ला व बिट्टु भाई यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अ‍ॅलेक्स ग्लेन मायकल (वय १९, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ८३६/२१) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससाणेनगर येथील गणपती मंदिरासमोर रविवारी सायंकाळी साडेसात वाजता (Pune Crime) घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

फिर्यादी, त्यांचा भाऊ दिंगबर जाधव, अभिषेक जाधव, हर्षल पुरोहित हे मोमोज विक्री करीत होते. त्यावेळी आरोपी मोमोज खाऊन बिल न देता जात होते.
तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास सांगितले. त्यावरुन त्यांनी चिडून जाऊन फिर्यादी व इतरांना हाताने मारहाण केली.
फैजाज शेख याने हातात लोखंडी रॉड व बिट्टुभाई याने कोयता घेऊन ‘‘याची तर आता विकेट टाकतो,’’
असे म्हणून फिर्यादी यांचे मामा यांना जीवे मारण्यासाठी डोक्यावर, मानेजवळ, पाठीमागील बाजूस कोयत्याने वार केले.
स्पर्श शुक्ला व प्रसाद आंबेकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्ही इथले भाई आहोत.
कोणी आम्हाला बिल मागितले तर आम्ही त्याची विकेट टाकू अशी धमकी देऊन दहशत पसरविली.
सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | attempt to murder news crime registered in hadapsar police station

 

हे देखील वाचा :

Modi Government | पेट्रोल पंप उघडून दरमहा करा लाखोची कमाई, मोदी सरकारने आणली नियमांमध्ये शिथिलता

WhatsApp वर अमूलकडून 6000 रुपये कमावण्याचा मेसेज आला तर व्हा Alert, रिकामे होईल बँक अकाऊंट

Rakesh Jhunjhunwala | ‘या’ 5 कारणांमुळे राकेश झुनझुनवाला म्हणाले असावेत का? – ‘आता आपली वेळ आलीय !’

 

Related Posts