IMPIMP

Pune Crime Branch Raid On Plink Yerawada | येरवडा परिसरातील ‘हॉटेल प्लिंक’ वर गुन्हे शाखेचा छापा, दोघांना अटक

by sachinsitapure

पुणे : – Pune Crime Branch Raid On Plink Yerawada | पोर्शे कार अपघातानंतर (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune) शहरात विनापरवाना आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्या पब, बार, रुफटॉप हॉटेलवर पुणे पोलीस (Pune Police), राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department Pune) आणि पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation – PMC) कारवाई करण्यात येत आहे (Pubs In Pune). मात्र, बार चालकांवर याच काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. येरवड्यातील क्रिएटीसिटी मॉलमध्ये (Creaticity Mall) असलेल्या किंग्स फूड अँड ब्रेवरी (King’s Food and Brewery), हेलियम बार अँड रेस्टॉरंट (Helium Bar & Restaurant) या कंपन्यांच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या ‘हॉटेल प्लिंक’ (Hotel Plink Pune) वर गुन्हे शाखेचा छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे. याठिकाणी बेकायदा विदेशी दारु आणि बियर विकली जात असल्याचे समजल्यानंतर कारवाई करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृष्णा रामचंद्र नेवपाने Krishna Ramchandra Nevpane (वय 34, रा.अन्सारी कॉम्प्लेक्स, संजय पार्क), मॅनेजर गौरव मंगेश वाघोलीकर Gaurav Mangesh Wagholikar (वय 25, रा. आदर्श नगर, वडगाव शेरी) यांना ताब्यात घेण्यात आले असून पुणे शाखेने त्यांना येरवडा पोलिसांकडे (Yerawada Polie Station) सुपूर्द केले आहे. तर, जनरल मॅनेजर दीपक देविदास मंडवले Deepak Devidas Mandwale (वय 43, रा. सर्वोदय रेसिडेन्सी, विशाल नगर, पिंपळे निलख) आणि मालक विवेक दिलीप चड्डा Vivek Dilip Chadda यांच्यावर देखील भारतीय दंडविधान कलम 188, 34 व महाराष्ट्र प्रोहीबिशन कायदा कलम 65 इ प्रमाणे येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस शिपाई अविनाश कोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोर्शे कार अपघातानंतर पुण्यातील पब-बार-रुफटॉप हॉटेलचा विषय ऐरणीवर आला आहे. पुणे पोलिसांनी हॉटेल चालकांना नियम व अटी घालून दिल्या आहेत. मात्र, याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधून टीका झाल्यानंतर आणि प्रसारमाध्यमांनी यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरु केला आहे. पुणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागा, पुणे महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थाशी संबंधीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेलवर बुलडोझर चालवत अवैध बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तब्बल 70 बार बंद केले आहेत.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला ‘हॉटेल प्लिंक’ येथे बेकायदेशीर दारु विकली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी करुन याठिकाणी छापा टकला. हॉटेलमध्ये विदेशी दारु आणि बिअर विनापरवाना तसेच बेकायदेशीर विकण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानुसार संबंधितांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले.

यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांनी सांगितले की, या हॉटेलचा चालक चोरून दारू विकत होता. यापूर्वी हे हॉटेल सील करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला होता. 6 जून रोजी येरवडा पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्लिंक हॉटेलवर चोरून दारु विकताना मिळाल्याबाबत एकत्रितपणे छापा टाकला होता. हे हॉटेल सील करण्याबाबत पुन्हा स्मरणपत्र पाठवीत आहोत असे शेळके यांनी सांगितले.

Related Posts