IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न ! एस.आर. ए. डेव्हलपर्स च्या 4 भागिदारांसह वास्तुविद्या विशारदाविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कागदपत्रांमध्ये खोटा रस्ता दाखवून बांधकामाचा आराखडा (Construction plan) मंजूर करुन जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) बांधकाम व्यवसायिकासह (builder) 5 जणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार (court order) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बावधन येथे फेब्रुवारी 2021 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी राजेंद्र बाळनाथ भुंडे Rajendra Balnath Bhunde (वय 46 रा. आनंदनगर पार्क सोसायटी, पौड रोड, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एस.आर.ए. प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स लि. (S.R.A. Promoters and Developers Ltd.) चे भागीदार शामकांत जगन्नाथ शेंडे (Shamkant Jagannath Shende), मुकेश मनोहर येवले (Mukesh Manohar Yeole), सुनील पोपटलाल नहार (Sunil Popatlal Nahar), सचिन पोपटलाल नहार (Sachin Popatlal Nahar) आणि वास्तु विद्या विशारद सिमा गोहाड (Sima Gohad) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रामाणिकपणे अफरातफर केली. फिर्यादी यांना खोटी प्रलोभने दाखवून फिर्यादी यांना त्यांच्या मालकीची जमिन देण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन बनावट आराखडा बनवून राजेंद्र भुंडे यांची फसवणूक केली. तसेच आरोपींनी खोटे नाव दाखवून भोंडे यांचा 7/12च्या संदर्भात 2019 च्या मंजूर आराखड्यातून खोटे दस्त (Pune Crime) दाखवले. यातून फिर्यादी यांची जमीन हडपण्याचा कट रचला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, राजेंद्र भुंडे यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेत अर्ज केला.
त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशानुसार हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | builder Attempt to grab place in Pune ! FIR against architect with 4 partners of S.R.A. Promoters and Developers Ltd

 

हे देखील वाचा :

Shweta Tiwari | पिवळ्या साडीत श्वेता तिवारीने लावली आग, अतिशय हाॅट आणि बोल्ड अंदाजात शेअर केले फोटो

Indian Railways सोबत अवघ्या रू. 4000 मध्ये सुरू करा आपला बिझनेस! दरमहिना होईल 80,000 रुपयांपर्यंत कमाई, जाणून घ्या प्रोसेस

Income Tax Return | लॉग-इन पासवर्ड विसरल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नाही का? अशा प्रकारे रिकव्हर करू शकता अकाऊंट

 

Related Posts