IMPIMP

Income Tax Return | लॉग-इन पासवर्ड विसरल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत नाही का? अशा प्रकारे रिकव्हर करू शकता अकाऊंट

by nagesh
ITR | common itr form for all taxpayers income tax updates news new itr rules

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return | आर्थिक वर्ष 2020-21 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. यापूर्वी, जर तुम्ही लॉग-इन पासवर्ड विसरलात आणि या कारणास्तव तुमचे रिटर्न फाइल करू शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तीन प्रकारे लॉगिन पासवर्ड रिकव्हर कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील आणि त्यानंतर तुम्ही तुमचे खाते सहज उघडू शकाल आणि आयकर रिटर्न भरू शकता. (Income Tax Return)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

आधार OTP द्वारे

– सर्वप्रथम ई-फायलिंगच्या होमपेजवर जा आणि लॉग-इनवर क्लिक करा.

– त्यामध्ये User ID टाका आणि Continue वर क्लिक करा.

– लॉगिन स्क्रीनवर Secure Access Messenger अंतर्गत, Forgot Password च्या पर्यायावर क्लिक करा.

– येथे User ID टाका आणि Continue वर क्लिक करा.

– पासवर्ड रिसेट करा पृष्ठावर, आधार OTP पर्याय निवडा.

– जनरेट OTP निवडा आणि Continue वर क्लिक करा.

– Verify Your Identity पेजवर, घोषणा चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि आधार OTP जनरेट करा वर क्लिक करा.

– तुमच्या आधारसोबत रजिस्टर मोबाईल नंबरवर मिळालेला OTP एंटर करा. आणि Verify पर्यायावर क्लिक करा.

– आता नवीन पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा आणि सबमिट वर क्लिक करा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ई-फायलिंग OTP द्वारे

– ई-फायलिंग होमपेजवर जा आणि लॉग-इन वर क्लिक करा.

– तुमचा यूजर आयडी एंटर करा आणि Continue वर क्लिक करा.

– लॉग-इन स्क्रीनवर, सिक्युअर अ‍ॅक्सेस मेसज अंतर्गत Forgot Password पयार्यावर क्लिक करा.

– रिसेटपासवर्ड पेजवर, ई-फायलिंग ओटीपी निवडा आणि कंटीन्यूवर क्लिक करा.

– तुमची जन्मतारीख निवडा. आणि Continue वर क्लिक करा.

– तुमच्या रजिस्अर मोबाईल फोन नंबर आणि ईमेल पत्त्यावर पाठवलेले दोन्ही ओटीपी नोंदवा आणि नंतर व्हेरिफाय करा वर क्लिक करा. (Income Tax Return)

– Set New Password मध्ये नवीन पासवर्ड टाका आणि पासवर्ड कन्फर्म करा आणि सबमिटवर क्लिक करा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटद्वारे

– ई-फायलिंग होमपेजवर जा आणि लॉग-इनवर क्लिक करा.

– User ID टाका आणि Continue वर क्लिक करा.

– लॉग-इन स्क्रीनवर, सिक्युअर अ‍ॅक्सेस मेसेज अंतर्गत Forgot Password पर्यायावर क्लिक करा.

– पासवर्ड रिसेट पेजवर, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट निवडा आणि कंटीन्यू वर क्लिक करा.

– Set New Password मध्ये नवीन पासवर्ड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

 

Web Title :- Income Tax Return | unable to fill income tax return due to forgetting login password account recovered in this way

 

हे देखील वाचा :

Pune Gram Panchayat recruitment scam | पुणे मनपामध्ये समाविष्ट झालेल्या समाविष्ट 23 गावांतील ग्रामपंचायत नोकर भरती ‘महा’ घोटाळा! 14 ग्रामसेवक, 3 कृषी विस्तार अधिकारी निलंबित

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का?’

Nora Fatehi Bold Photo | नोरा फतेहीच्या ‘या’ बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts