IMPIMP

Pune Crime | एम.जी एन्टरप्रायजेस कडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक, सोमजी दाम्पत्यावर FIR

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  गुंतवणूक (Investment) केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा (24 percent return) देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील (Pune Crime) अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) एका दाम्पत्याविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2010 ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पुण्यातील (Pune Crime) मंगलदास रोडवरील एम.जी. एन्टरप्रायजेसच्या (M.G. Enterprises) कार्यालयात घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अलनेश अकील सोमजी (Alnesh Akil Somji), डिंपल अलनेश सोमजी Dimple Alnesh Somji (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) असे गुन्हा (FIR)
दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेश विष्णु दिक्षीत Yogesh Vishnu Dixit (वय-41 रा. नाना पेठ)
यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांच्यासह इतर दोघांची तब्बल 3 कोटी 37 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला एम.जी. एन्टरप्रायजेस या फर्ममध्ये पैसे गुंतवल्यास त्या रकमेवर 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीवर विश्वास ठेवून 45 लाख रुपये गुंतवले (Pune Crime).
ही रक्कम डिंपल सोमजी यांच्या बँक खात्यावर जमा केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

फिर्यादी यांनी जमा केलेल्या 45 लाखावर 21 लाख 90 हजार असे एकूण 66 लाख 90 हजार रुपये देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले.
मात्र, आरोपींनी त्यांना परतावा आणि मुद्दल न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
याशिवाय आरोपींनी किरण शेट्टी यांची 57 लाख 33 हजार आणि माया चावला यांची 1 कोटी 22 लाख 25 हजार रुपयांची
आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत (Pune Crime) नमूद केले आहे.

पैशांची मागणी करुन देखील पैसे मिळत नसल्याने फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता.
तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक
(Anti-Ransom Squad) दोनचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | cheating case FIR against Alnesh Akil Somji and Dimple Alnesh Somji in Koregaon Park Police Station

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune NCP | पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं’

MLA Madhuri Misal | सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा – आमदार माधुरी मिसाळ

 

Related Posts