IMPIMP

Pune Crime | बजाज फायनान्सलाही सायबर चोरट्यांचा ‘झटका’; कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याने व्यवसायाला ‘फटका’

by nagesh
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सोशल मिडिया (Social Media) प्लॅटफार्मवर वेगवेगळ्या संस्थांपासून शासकीय कार्यालयांची बनावट फोन नंबर (Fake Phone Number) टाकून त्यावर संपर्क करण्यांना सायबर चोरटे गंडा घालत असल्याचे आजवर अनेक प्रकरणात आढळून आले आहे. या सायबर चोरट्यांनी बजाज फायनान्सलाही (bajaj finance corporate company) झटका दिला आहे. कंपनीच्या ट्रेड मार्कचा (Tread Mark Logo) गैरवापर करुन कंपनीच्या नावाने फसवणूक केल्याचे अनेक प्रकार आढळून आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी बजाज फायनान्स कंपनीच्या वतीने युवराज मोरे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी स्टेट बँक खातेधारक व काही मोबाईलधारकांवर आयटी अ‍ॅॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

 

बजाज फायनान्स कंपनीचा लोगो वापरुन तसेच कंपनीच्या नावाने फेसबुक व ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉमवरुन फेक अकाऊंट तयार केली.
त्यावर नागरिकांनी संपर्क साधल्यावर त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज तसेच इंश्यूरंन्स पॉलिसी काढून देत असल्याचे खोटे सांगून त्यासाठी अ‍ॅडव्हास रक्कम भरावयास लावली जात.
नागरिकांनी पैसे भरल्यावर त्यांना कोणतेही कर्ज अथवा इंश्युरन्स न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे कंपनीच्या लक्षात आले.
या प्रकारामुळे कंपनीचे नाव प्रतिमा जनमानसामध्ये बदनाम होत आहे.
त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होत असून आर्थिक नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

Web Title :  pune crime | cheating with bajaj finance corporate company by using fake tread mark logo

Related Posts