IMPIMP

Pune Crime | फिर्यादीच निघाला आरोपी ! अपघाताचा बनाव अन् 40 लाखाची दारु लुटण्याचा प्रयत्न फसला

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन अपघाताचा बनाव करुन 40 लखाची दारु चोरणाऱ्या (Pune Crime) ट्रक चालक व ट्रकच्या मालकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) बारामती तालुका पोलिसांनी (Baramati taluka police) अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) उंडवडी कडेपठार येथे दारुचे बॉक्स (liquor Box) घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता फिर्यादीच आरोपी असल्याचे समोर आले आहे.

 

चालक अंकुश बेंद्रे (रा. बारामती) व मालक अजिनाथ जराड (रा. बारामती) दोघांविरुद्ध अपघाताचा बनाव (attempt rob alcohol) करत अपहार केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या (Baramati Taluka Police Station) हद्दीत असणाऱ्या मॅकडॉल कंपनीमधून दारुचे बॉक्सचा 65 लाख 87 हजारांचा माल घेऊन निघाला होता.
उंडवडी कडेपठार (Undawadi kadepathar) या ठिकाणी हा ट्रक पलटी झाला.
परंतु चालक आणि ट्रक मालकाने अपघाताचा बनाव केला होता.
नंदकुमार क्षिरसागर (रा. गोतोंडी, ता. इंदापुर) याच्या मदतीने ट्रकमधील दारुचे 500 बॉक्स असा 40 लाखांचा माल एका गोडाऊनमध्ये बेंद्रे आणि जराड यांनी लपवला (Pune Crime) होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

चौकशीत बनाव केल्याचा संशय

 

या घटनेचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शोध पथकाला पोलीस निरीक्षक महेश ढवाण (Police Inspector Mahesh Dhawan) यांनी दिले होते.
उंडवडी येथे झालेल्या अपघाताची माहिती घेतली असताना, चालकाला विचारलेल्या प्रश्नांवरुन पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी ट्रक कंपनी मधून निघाल्यापासून रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये ट्रक पहिल्यांदा भवानीनगर या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले.
यावरुन पोलिसांनी सखोल चौकशी (Pune Crime) केली असता फिर्यादीच चोर असल्याचे समोर आले. आरोपीने आर्थिक फायद्यासाठी अपघाताचा बनाव केला.

 

40 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

फिर्यादीचा मित्र नंदकुमार क्षीरसागर याच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले 40 लाखांचे 500 दारुचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.
गाडीचा अपघात झाल्याचे भासवण्यासाठी ट्रक पलटी करुन गावातील लोकांनी दारु लुटून नेली, अशी फिर्याद देण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Additional Superintendent of Police Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle), पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खरात,
पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, सदाशिव बंडगर, अनिकेत शेळके यांच्या पथकाने केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | complainant thief caught attempt rob alcohol pretending have accident failed pune rural police

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | ‘माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत?’

PING PONG OTT | ‘पिंग पॉंग’ कॉमेडीचा ‘किंग काँग’ ! ‘पिंग पॉंग’ या OTT प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार धम्माल कॉमेडीचा आनंद

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

 

Related Posts