IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बड्या व्यावसायिकाकडे 7 कोटीच्या खंडणीची मागणी; कोरेगाव पार्कमधील अमन दुग्गलविरूध्द FIR

by nagesh
Pune Crime News | 25 lakh extortion demand from govt contractor, FIR against 7; Incidents in Pimpri Chinchwad area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देणार्‍या कंपनीविषयी बदनामीकारक व्हिडिओ युट्युबवर (YouTube) टाकून कंपनीच्या संचालकांकडे ७ कोटी रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी जितेंद्र शिवदयाल चौक्सी (वय ३६, रा. परिजात, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमन दुग्गल Aman Duggal (वय २८, रा. कोरेगाव पार्क – Koregaon Park) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ जून २०२१ ते २ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितेंद्र चौक्सी यांची स्कॉट फिटनेस नावाची कंपनी आहे. त्याचे फिटर नावाचे अ‍ॅप असून त्यावर लोक शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण घेत असतात. त्यांच्या कंपनीला ड्रिम कॅपिटल व एलिशन पार्क या कंपनीने फंडिग केले आहे. आरोपी अमन दुग्गल याने फिर्यादी यांच्याबाबत युट्युबवर व्हिडिओ टाकून बदनामी केली. ड्रिम कॅपिटल व एलिशन पार्क या कंपनीने फंडिंग केली असल्याने फिर्यादी यांना त्यांनी अगोदर ४ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली.

 

तसा व्हिडिओ यु ट्युबवर पोस्ट केला. जर पैसे दिले नाही तर हा आकडा वाढत जाईल.
जुलै मध्ये ५ कोटी होईल. ऑगस्टमध्ये ६ कोटी आणि सप्टेबरमध्ये ७ कोटी होइल.
ते पैसे तुला माझ्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतील.
ते पैसे दिले नाही तर तुला त्याचे गंीीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने २० ऑगस्ट रोजी यु ट्युबवर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला.
त्या व्हिडिओमध्ये फिर्यादीच्या प्रतिष्ठेवर आणि व्यक्तीमत्वावर वाईट शब्दात हल्ला केला.
अमन दुग्गल याने धमक्या देऊन व्हिडिओ यु ट्युबवर व ईस्टाग्रामवर पोस्ट करुन खंडणीची मागणी केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Extortion demand of 7 crores from a big businessman in Vimannagar area of pune; FIR against Aman Duggal in Koregaon Park

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts