IMPIMP

Pune Crime | ‘थांब तुला खल्लास करतो’ म्हणत तरुणावर केला ‘बुछूट’ गोळीबार, पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणावर दोन गोळ्या (Firing In Pune) झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची धक्कादयक घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी येथे घडली आहे. तसेच या टोळक्याने हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) 11 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील शिव शंकर सोसायटी (Shivshankar Society) मध्ये शनिवारी (दि.6) रात्री 11 च्या सुमारास घडला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सौरभ सरवदे (Saurabh Sarvade), रुपेश सोनवणे उर्फ डिजे (Rupesh Sonawane alias DJ), निलेश सोनवणे (Nilesh Sonawane), गणेश जगदाळे (Ganesh Jagdale), बाबा बडबडे (Baba Badbade), अनिल कांबळे (Anil Kamble) व त्यांचे इतर 5 ते 6 साथिदारांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित कैलास थोपटे Amit Kailas Thopte (वय-32 रा. शिव शंकर सोसायटी, गल्ली क्र.2 बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांच्यामध्ये शुक्रवारी (दि.4) वाघजाई मंदिर (Waghjai Temple) येथे भांडण झाले होते. शनिवारी रात्री 11 च्या सुमारास फिर्यादी हे त्यांचा भाऊ अमोल थोपटे, गणेश मोडावत व गल्लीतील इतर 4 ते 5 जण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी वाघजाई मंदिर येथे झालेल्या भांडणाच्या करणावरुन दुचाकीवरुन हतात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन आले. आरोपींनी शिवीगाळ करुन ‘थांब तुला खल्लास करतो’ असे म्हणत पिस्टलमधून (Pistol) फिर्यादी यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरडा ओरडा करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन पितळी पुंगळ्या जप्त केल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar), सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळूखे (API Pravin Kalukhe), पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे (PSI Vikrant Dige), पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग (PSI Sanjay Adling) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Firing incident near Shivshankar Society of Bibvewadi police station Limits

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात आईनेच विकले 4 वर्षाच्या मुलाला अन् रचला अपहरणाचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग; 8 जणांना अटक

पुढील वर्षी लाँच होईल भारताचा Digital Rupee, ट्रेडिशनल करन्सीपेक्षा वेगळे नसेल; जाणून घ्या

Pune Political News | कुटुंब कलह की कुटुंबातील आणखी एक सदस्य महापालिकेत पाठविण्यासाठी केलेली ‘तडजोड’? राजकीय वर्तुळात चर्चा

Anil Parab | एसटी विलीनीकरणाचा अहवाल 2 दिवसात, अनिल परब यांची माहिती

 

Related Posts