IMPIMP

Pune Political News | कुटुंब कलह की कुटुंबातील आणखी एक सदस्य महापालिकेत पाठविण्यासाठी केलेली ‘तडजोड’? राजकीय वर्तुळात चर्चा

by nagesh
Pune Political News | Family quarrel or compromise to send another family member in to the Pune Municipal Corporation Discussion in political circles

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Political News | काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांचे (Corporator Arvind Shinde) पुतणे प्रणय शिंदे (Pranay Shinde) यांनी आज भाजप (BJP) मध्ये प्रवेश केल्याने उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. कुटुंब कलह की कुटुंबातील आणखी एक सदस्य महापालिकेत पाठविण्यासाठी केलेली ‘तडजोड’ ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Pune Political News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अरविंद शिंदे 1997 पासून एक पंचवार्षिक वगळता पुणे स्टेशन (Pune Station) परिसरातून महापालिकेत काँग्रेसचे (Congress) प्रतिनिधित्व करत आहेत. या कालावधीत त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि गटनेते पदही भूषविले आहे. नुकतेच त्यांनी कसबा मतदार संघातून विधानसभा निवडणुकही (kasba vidhan sabha constituency) लढविली आहे. सध्या ते पुणे स्टेशन – ताडीवाला रोड (Pune Station-Tadiwala Road) परिसर प्रभागातून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रभागमध्ये काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक सदस्य आहे. उर्वरित तीनही नगरसेवक ताडीवाला रोड परिसरातील असून शिंदे पुणे स्टेशन परिसरातील आहेत. (Pune Political News)

 

नव्याने झालेल्या प्रभाग रचनेत शिंदे यांच्या प्रभागाची तोडफोड झाली आहे.
विशेषत: पुणे स्टेशन परिसरातील शिंदे यांना मानणारे सुमारे 8 हजाराहून अधिक मतदार नवीन प्रभाग क्र. 19, रास्ता पेठ – के. इ. एम. हॉस्पिटलला (KEM Hospital, Pune) जोडला गेला आहे.
या प्रभागातून भाजपचे गटनेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत.
या प्रभागात तूर्तास तरी काँग्रेस कडे बिनीचा शिलेदार नाही. तसेच भाजप कडेही बिडकर वगळता स्ट्रॉंग उमेदवार नाही. (Pune Politics)

 

 

अरविंद शिंदे हे पुणे स्टेशन – ताडीवाला रोड परिसरातून आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
या प्रभागातील ताडीवाला रोड प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप गायकवाड (Corporator Pradeep Gaikwad) हे देखील प्रबळ दावेदार आहेत.
विशेषत: याच भागातून मागील निवडणुकीत शिंदे हे पिछाडीवर राहिले होते.
केवळ पुणे स्टेशन परिसरातील हक्काच्या मतदारांनी त्यांना चांगली साथ दिली.
परंतु आता हक्काचा भाग तोडल्याने त्रिसदस्यीय निवडणुकीत प्रभाग क्र. 20 पुणे स्टेशन – ताडीवाला रोड परिसरातून शिंदे यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर भाजप मधून का होईना प्रभाग क्र. 19 रास्ता पेठ – के. ई. एम. हॉस्पिटल प्रभागातून कुटुंबातील सदस्य महापालिकेत जावा यासाठीच प्रणय शिंदे यांना भाजप मध्ये पाठवले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परंतु तूर्तास महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार की स्वतंत्र निवडणूक लढविणार, प्रणय शिंदे यांनी भाजप प्रवेश केला तरी भाजप त्यांना तिकीट देणार का या बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत.
प्रत्यक्षात प्रभाग रचना अंतिम होऊन आरक्षण सोडत होणे, निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष तिकीट वाटप होईपर्यंत प्रणय शिंदे यांच्या भाजप प्रवाशाने उलट सुलट चर्चा रंगत जाणार असेच चित्र आहे.

 

Web Title :- Pune Political News | Family quarrel or compromise to send another family member in to the Pune Municipal Corporation Discussion in political circles

 

हे देखील वाचा :

Anil Parab | एसटी विलीनीकरणाचा अहवाल 2 दिवसात, अनिल परब यांची माहिती

LIC New Jeevan Anand | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, रोज जमा करावे लागतील केवळ 73 रु.

Crisil Report | LIC जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी, परंतु रिटर्नच्या बाबतीत नंबर 1 – क्रिसिल रिपोर्ट

 

Related Posts