IMPIMP

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Forged documents for bail of accused in murder of senior police officer's son; Fraud of court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | खूनाचा गुन्हा आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन ती शिवाजीनगर येथील न्यायालयात सादर करुन फसवणूक (Cheating Case) करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी फौजदारी न्यायालय क्रमांक ४ चे सहायक अधीक्षक विनायक जाधव (Vinayak Jadhav) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक बाळासाहेब वाळके Pratik Balasaheb Walke (रा. चिखली – Chikhali), समाधान पांडुरंग सोनार Samadhan Pandurang Sonar (वय २८, रा. कोथरुड – Kothrud) आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील (Shivaji Nagar Court Pune) कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात २० ऑक्टोबर रोजी घडला होता. (Pune Crime)

 

विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Pune) ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ओकांरेश्वर मंदिराच्या मागील बाजूला दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा माल व दरोड्याचे साहित्य जप्त केले होते. हे सर्व जण आंध्र प्रदेशातील नेल्लुर जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यातील फिलीप नागराज समुद्रला याच्या जामिनाकरीता बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.

 

निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रघुनाथ खैरे यांचे पुत्र नरेंद्र खैरे (वय ३३) यांच्याबरोबर पार्किंगमध्ये गाडी
लावण्यावरुन २६ जून रोजी रात्री वाद झाला होता. तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण करुन त्यांचा खून केला होता.
या खुनाच्या गुन्ह्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) इतरांबरोबर रमेश इंद्रसिंग
परीवार याला अटक केली होती. त्याच्या जामिनाकरीता (Bail Order) त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता
नसतानाही आरोपींनी हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) चिखली येथे जमीन असल्याची बनावट कागदपत्रे
(Fake Documents) व ७/१२ चा उतारा तयार करुन तो न्यायालयात सादर केला.
न्यायालयाची फसवणूक केल्याचे समोर असल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून
सहायक पोलीस निरीक्षक माने (API Mane) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Forged documents for bail of accused in murder of senior police officer’s son; Fraud of court

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स

T20 World Cup 2022 | ‘या’ दिग्गजांचा हा शेवटचा T20 विश्वचषक असेल, टीम इंडियामध्ये बदलाला सुरुवात

 

Related Posts