IMPIMP

T20 World Cup 2022 | ‘या’ दिग्गजांचा हा शेवटचा T20 विश्वचषक असेल, टीम इंडियामध्ये बदलाला सुरुवात

by nagesh
T20 World Cup 2022 | this will be the last t20 world cup for these veterans changes will begin in team india

मेलबर्न : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये खेळत आहे. परंतु विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियामधील अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला पुन्हा टीममध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे. यामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) आणि आर अश्विन (R.Ashwin) यांचा समावेश असू शकतो. चेतन शर्माच्या (Chetan Sharma) नेतृत्वाखालील निवड समितीने 2024 चा वर्ल्डकप लक्षात घेता टीमची नव्याने बांधणी करायला सुरुवात केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यासाठी पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला (Hardik Pandya) टीम इंडियाचं कर्णधार पद सोपण्यात आलं आहे. हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड करुन सध्याची पिढी कर्णधार पद संभाळण्यासाठी सक्षम असल्याचा संदेश निवड समितीकडून देण्यात आला आहे. या समितीने विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहूल (K.L.Rahul) या दोन फलंदाजांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली आहे.

 

तर दिनेश कार्तिक याला न्यूझिलंड दौऱ्यात वगळण्यात आले आहे, तर आश्विनला रोहित शर्माने विनंती केल्यामुळे टीममध्ये ठेवण्यात आले आहे दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करीत असतानादेखील निवड समितीकडून त्याला डावलण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये कार्तिकला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात खेळेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. बीसीसीआयकडून (BCCI) याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. (T20 World Cup)

 

 

न्यूजीलंड टी20 सीरीजसाठी टीम- हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन,
दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव,
अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

न्यूजीलंड वनडे सीरीजसाठी टीम- शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा,
सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल,
कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | this will be the last t20 world cup for these veterans changes will begin in team india

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

Pune Fire News | लुल्लानगरमधील सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग

India Squad NZ Series | न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे देण्यात आहे कर्णधारपद

 

Related Posts