IMPIMP

Pune Crime | जमीन देण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाची 3.2 कोटींची फसवणूक, दोघांवर FIR

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | प्लॉटींगची जमीन विक्री करायची असल्याचे सांगून दोघांनी रिअल इस्टेट (Real Estate) व्यावसायिकाची तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) लोहगांव (Lohgaon) येथे फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) दोघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

धनराज ज्ञानेश्वर मोझे Dhanraj Dnyaneshwar Moze (वय-58 रा. मोझे आळी, लोहगांव),
भरत बाळासाहेब पवार Bharat Balasaheb Pawar (वय-35 रा. डी.वाय. पाटील कॉलेज रोड, लोहगांव) यांच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मनिष ज्ञानेश्वर म्हस्के Manish Dnyaneshwar Mhaske (वय-48 रा. ज्ञानाई बंगला, कळसमाळवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष म्हस्के यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.
आरोपींनी संगनमत करुन फेब्रुवारी 2014 मध्ये म्हस्के यांच्याशी संपर्क साधला.
त्यांना सुभाष गोयल (Subhash Goyal) यांच्या मालकीची लोहगाव येथील 16.5 एकर जमीन प्लॉटींग करीता विक्री करायची असल्याचे सांगितले.
गोयल यांची जमीन तुम्हाला मिळवून देतो असे सांगून आरोपींनी म्हस्के आणि गोयल यांची ओळख करुन देत व्यवहार ठरवला.

या व्यवहाराचा गैरफायदा घेत आरोपी धनराज मोझे याने म्हस्के यांच्याकडून जमिनीच्या मोबदल्यात 2 कोटी 75 लाख रुपये घेतले.
तर आरोपी भरत पवार याने देखील 45 लाख रुपये म्हस्के यांच्याकडून वेळोवेळी घेतले.
यानंतर म्हस्के यांनी जमीनीबाबत मोझे आणि पवार यांच्याकडे विचारणा केली.
त्यावेळी आरोपींनी जमीनीचा व्यवहार पूर्ण करुन देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे म्हस्के यांनी आरोपींना दिलेले 3 कोटी 20 लाख रुपयांची मागणी केली.

आरोपींनी म्हस्के यांना पैसे मिळणार नाहीत असे सांगून पुन्हा पैसे मागायचे नाहीत असे सांगितले.
तसेच पुन्हा पैशांची मागणी केली तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी (Threat) दिली.
आरोपींनी फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज म्हस्के यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिला.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 3.2 crore by real estate professional under the pretext of giving land, FIR against both

 

हे देखील वाचा :

Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, घरामध्ये केला चोरीचा प्रयत्न

 

Related Posts