IMPIMP

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, घरामध्ये केला चोरीचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | Attempted burglary in a house by a thief within the limits of Khadak police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. स्थानिक नागरिकांनी या चोरट्याला पकडून बेदम चोप (Pune Crime) देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांकडून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

 

विठ्ठल वामन भोळे (वय 45, रा. जळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे.
हा चोरटा चोरीच्या उद्देशाने खडक माळ आळी येथे आला होता. खडक माळ आळीमध्ये असलेल्या चर्चजवळील एका इमारतीमध्ये चोरी करण्यासाठी गेला. चोरी करण्याकरिता तो एका फ्लॅटमध्ये घुसला.
येथे राहणारे आवेज सलिम अन्सारी (वय 23) हे जेवण झाल्यावर दुपारी टेरेसवर गेले होते.
जेवण करून खाली येत असताना त्यांना चोरटा घरात घुसल्याचे लक्षात आले.
अन्सारी यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तेव्हा गावठी पिस्टलमधून हवेत गोळीबार केला.
या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असून अन्सारी याच्या हाताला जखम झाली आहे..
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

घटनेची माहिती मिळताच फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) , खडक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे पोलिस
अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धावले.
या चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या सोबतच तो काही दिवसांपूर्वीच नाशिक कारागृहातून पॅरोलवर बाहेर आल्याचे समोर आले आहे.
एका खून प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता असं कळतंय.
त्याच्यासोबत एक महिला होती असा पोलिसांना संशय असून त्याच्याकडे त्याबाबत चौकशी सुरू आहे.
अधिक तपास खडक पोलिस करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तुल आणि एक पुंगळी जप्त केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Attempted burglary in a house by a thief within the limits of Khadak police station

 

हे देखील वाचा :

Crime News | 500 रुपयांवर प्रतिदिन 100 रुपये व्याज, खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 2 तरुणांची आत्महत्या

Pune Crime | विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून 3 लाखाची फसवणूक, दोघांवर FIR

Covid-19 | जगातील सर्वात विषारी साप वाचवणार मनुष्याचा जीव, कोरोना व्हायरसविरूद्ध ’रामबाण’ ठरले विष

 

Related Posts