IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! फी भरण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नवर्‍यानं बायकोला चक्क विहिरीत ढकललं, पण…

by nagesh
Pune Crime | lover do wrong things in girl house of hadapsar police station area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  प्रत्येक मुलीने शिकावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. मात्र, असे असताना पुण्यात (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीने पतीकडे शिक्षणासाठी (education) पैशांची मागणी केल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला विहिरीत ढकलून (husband pushed his wife into well) दिल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील (Pune Crime ) आंबेगाव तालुक्यातील मंचर-घोडेगाव (Manchar-Ghodegaon Taluka Aambegao) रस्त्यालगत घडला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीचे नशीब बलवत्तर म्हणून ती या घटनेत बचावली आहे.

या प्रकरणी वनिता अनिल राठोड (Vanita Anil Rathod) यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) फिर्याद दिली असून मंचर पोलिसांनी आरोपी पती अनिल राठोड याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
आरोपी अनिल हा अवसरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात (Avsari Polytechnic College) लॅब असिस्टंट (Lab Assistant) म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पीडित विनिता यांनी पती अनिल याच्याकडे शिक्षणासाठी पैसे मागितले होते.
सोमवारी सकाळी वनिता यांनी पती अनिल याच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी मागितली.
त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुझ्या माहेरावरुन पैसे माग असे त्याने सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
दरम्यान, वनिताने तुम्ही मला फी भरण्यासाठी पैसे द्या किंवा माहेरी सोडा असे पतीला सांगितले.
यानंतर पतीने वनिताला फिरायला जाऊ असे सांगून तिला घेऊन गेला.
तपनेश्वर मंदिराजवळून चालत जात असताना रस्त्याच्या कडेला असेल्या विहिरीत अनिलने वनिताला ढकलून दिले.

पतीने विहिरीत ढकलून दिल्यानंतर तिने आरडाओरडा करुन मदत मागितली.
यावेळी वनिताचा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत वनिताला विहिरीतून बाहेर काढले.
नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर तिने पतीने आपल्याला विहिरीत ढकलून दिल्याचे सांगितले.
या प्रकारानंतर पती अनिल याने वनिता धमकावले आणि इस्त्रीच्या कारणावरुन वाद झाल्याचे सांगण्यास सांगितले.
पुढील तपास मंचर पोलीस (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | husband pushed his wife into well because she asked money for education in manchar ghodegaon aambegao in pune district

 

हे देखील वाचा :

Indian Pension System | पेन्शन सिस्टमबाबत मोठी बातमी, जाणून घ्या निवृत्तीनंतरच्या नियोजनांवर काय सांगतो अहवाल

Gita Gopinath | IMF चं ‘चीफ इकॉनॉमिस्ट’ पद सोडणार गीता गोपीनाथ, Harvard University मध्ये परतणार

Beach Vacation Pictures | ब्लॅक बिकीनीमध्ये 42 च्या बिपाशाचा दिसला एकदम कडक लूक, पतीसोबत दिली रोमँटिक पोज

 

Related Posts