IMPIMP

Pune Crime | विश्रांतवाडीत पूर्वीच्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार, 6 सराईत गुन्हेगारांवर FIR

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पूर्वी झालेल्या भांडणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने आणि बंबूने वार करुन गंभीर जखमी (Seriously Injured) केले. ही घटना (Pune Crime) बुधवारी (दि.23) दुपारी तीनच्या सुमारास विश्रांतवाडी येथील वाल्मिकी नगर (Valmiki Nagar Vishrantwadi) येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फराण शकील शेख (वय-21 रा. सायप्रस लाईन, खडकी बाजार) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi police station) फिर्याद दिली आहे. सैफ उर्फ अरबाज शेख (वय-24), विनीत भालेराव (वय-23), अर्थव माने (वय-22), प्रसाद कांबळे (वय-23), सुनील झेडे (वय-21), ओसामा कुरेशी (वय-19 सर्व रा. फुलेनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते. तसेच मंगळवारी (दि. 22) वाद झाले होते.
बुधवारी दुपारी फराण हा त्याचा मित्र साहिल याच्या घराजवळ कबुतरांना गहू देण्यासाठी गेला होता.
आरोपींनी पूर्वीच्या वादातून फराण याच्यावर कोयता आणि बांबुने हल्ला केला.
ते दोघे झोपडपट्टीत पळून जात असताना आरोपींनी फराण शेख याचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले.
पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In a previous altercation at Vishrantwadi, a youth was stabbed with a scythe, FIR was lodged against 6 criminals

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी’ – देवेंद्र फडणवीस

Former MLA Mohan Joshi | भाजपमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे पुण्याचे विमानतळ धोक्यात – माजी आमदार मोहन जोशी

Parambir Singh | राज्य सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! परमबीर सिंह यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

 

Related Posts