IMPIMP

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | आम्हाला ओळखत नाही का? असे म्हणत दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करत टोळक्याने परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी 6 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) हडपसरमधील (Hadapsar) रामटेकडी परिसरात घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी चिक्क्या भडके, बंटी निकाळजे, मोनू शेख, आर्यन माने, सुनीत शिंदे, चिनू, अनिकेत सोनवणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनमोहन मृत्युंजयप्रसाद तिवारी (वय 24, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक सागर चतुर्वेदी, प्रिन्स गौतम, आशिष तिवारी,
संकर्षण तिवारी रामटेकडी परिसरातील अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ (Annabhau Sathe Park) गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी चिक्या भडके व त्याचे इतर साथिदार त्याठिकाणी आले. त्यांनी तिवारी आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्हाला ओळखले नाही का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली.
आरोपींनी फिर्यादी आणि आशिष तिवारी यांच्यावर धारदार चाकुने वार केले.
तसेच त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Ramtekdi area of Hadapsar, gang terror attacked two with weapons

 

हे देखील वाचा :

Chandni Chowk Flyover | चांदणी चौक पुल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामाचा आढावा

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

 

 

Related Posts