IMPIMP

Pune Crime | कोंबडीचे मटण का आणले नाही म्हणत डोक्यात दगड घालून खून; लोणीकंद परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोंबडीचे मटण का आणले नाही, याकारणावरुन महिला व तिच्या मुलीला मारहाण करीत असताना त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालून खून (Murder In Pune) करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

शंकर नायक Shankar Nayak (वय ३५, रा. रानवारा हॉटेलसमोर, केसनंद वाडेबोल्हाई रोड, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) विकास भोसले (Vikas Bhosale), कविता भोसले (Kavita Bhosale),
बल्ला अशा तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार रानवारा हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे.
याबाबत मेहबु शंकर नायक Mehbu Shankar Nayak (वय ४०) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
फिर्याद (गु. रजि. नं. ४१७/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत.
यातील आरोपी विकास भोसले यांनी फिर्यादी यांना कोंबडीचे मटण का आणले नाही, असे म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांचे मुलीस मारहाण करु लागले.
तेव्हा फिर्यादी यांचे पती शंकर नायक हे भांडणे सोडविण्यासाठी आले.
त्यावेळी त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) करुन जखमी केले.
तेथे पडलेला दगड शंकर नायक यांच्या डोक्यात घालून त्यांना जीवे ठार मारले.
सहायक पोलीस निरीक्षक पवार (Assistant Police Inspector Pawar) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Killed by throwing a stone on the head saying why they did not bring chicken mutton Incidents in Lonikand area

 

हे देखील वाचा :

Aakash BYJU’S | आकाश बायजू’जने पुण्यात विमान नगर येथे आपले नवीन सेंटर केले सुरू; शहरातील आकाश बायजू’ज सेंटर्सची संख्या 5 वर

CM Eknath Shinde | शिंदे-फडणवीसांचे धक्कातंत्र; मंत्र्यांकडेच आवडींच्या खात्यांबाबत मागितले 2-3 पर्याय

Ajit Pawar | अंबादास दानवेंच्या नियुक्तीवर अजित पवारांचा शिवसेनेला पाठिंबा, नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

 

Related Posts