IMPIMP

Pune Crime | पुणे पोलिसांकडून किरण गोसावीची महिला असिस्टंट शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक

by nagesh
Pune Crime | Another FIR against Kiran Gosavi witness of ncb in Aryan Khan drugs case; Increased difficulty

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Pune Crime | कॉर्टेलिया क्रूझवर (Cortellia Cruz) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drugs Case) अटक केल्यानंतर किरण गोसावी सेल्फीमुळे चर्चेत आला होता. या प्रकरणात ज्या किरण गोसावीला (Kiran Gosavi) एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो एक सराईत गुन्हेगार (Criminal) असल्याचे समोर आले आहे. किरण गोसावी याच्यावर पुणे येथे गुन्हा दाखल असून पुणे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस (Lookout notice) काढली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक (Pune Crime) केली आहे. शेरबानो कुरेशी (Sherbano Qureshi) असं या महिला असिस्टंटचे नाव आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुण्यात 2018 मध्ये केलेल्या फसवणूक (Cheating) प्रकरणी किरण गोसावी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पुण्यातील चिन्मय देशमुख (Chinmay Deshmukh) नावाच्या तरुणाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली होती. मलेशियात (Malaysia) नोकरी (Jobs) लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांनी तीन लाख रुपये तरुणाकडून घेतले होते. त्यांच्याविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) गुन्हा (Pune Crime) नोंद केला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली आहे. तर किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी दोन पथके पाठवण्यात आली आहेत.

 

दरम्यान, किरण गोसावीचा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध घेतला जात (Pune Crime) आहे.
त्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे.
तर अटक करण्यात आलेल्या महिला असिस्टंट कुरेशीला न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Pune Crime | Kiran Gosavi’s female assistant Sherbano Qureshi arrested by Pune police from Mumbai in fraud case of Faraskhana police station

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट

Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास तरूणांसाठी इंडियन नेव्हीत 2500 पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | पुण्याच्या भवानी पेठेतील सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यावरुन दोघे ज्येष्ठ हातघाईवर; एकमेकांना मारहाण

IAS Manisha Patankar-Mhaiskar | ट्रेकिंगसाठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला

 

Related Posts