IMPIMP

Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापुर्वी जन्मलं ‘बाळ’, 25 वर्षीय तरूणीने प्रियकरानं ‘बरेवाईट’ केल्याचं मुंढवा पोलिसांना सांगितलं

by nagesh
Pune Crime | live in partner dumped our baby in a forest to die

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापूर्वी जन्म दिलेल्या मुलाचे बरेवाईट केल्याचा संशय तरुणीने व्यक्त केला असून मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) दोघांना अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शुभम महेश भांडे Shubham Mahesh Bhande (वय २३, रा. वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे Yogesh Suresh Kale (वय २६, रा. मारुती निवास, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट रोड, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या दोघांनी या मुलाचे नेमके काय केले हे सांगत नसून त्याचा शोध सुरु आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी (vadgaon sheri) येथे राहणार्‍या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आणि शुभम भांडे यांचे प्रेमसंबंध (love affair) होते. त्यातून ही फिर्यादी तरुणी गर्भवती (pregnant) राहिली.
तिने १४ मार्च २०१९ रोजी एका बाळाला मुंढवा येथील केशवनगरमधील एका घरात जन्म दिला.
ही गोष्ट त्यांनी इतरांपासून लपवून ठेवली.
बाळाच्या जन्मानंतर भांडे आणि काळे याने १३ दिवसाच्या बाळाला २३ मार्च २०१९ रोजी
सकाळी ११ वाजता या तरुणीकडून घेतले आणि आश्रमात ठेवतो.
असे सांगून घेऊन गेले. या गोष्टीला आता अडीच वर्षे झाली.
भांडे आणि काळे हे खासगी नोकरी करतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दरम्यान, ही तरुणी आणि शुभम भांडे यांचे ब्रेकअप झाले. तेव्हा तिने आपले बाळ कोठे आहे.
याची विचारणा केली. मात्र, भांडे याने तिला काहीही सांगितले नाही.
त्यामुळे शेवटी या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार अर्ज दिला होता.
त्याच्या चौकशी अहवालानुसार पडताळणी करुन मुंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला. दोघांनाही अटक (Mundhwa Police Arrest Two) केली असून तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी (Pune Crime) दिली आहे.
या दोघांनी त्या १३ दिवसाच्या बाळाचे काय केले याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी (senior police inspector bramhanand naikwadi) यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे (PSI S.R. Kate) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | live in partner dumped our baby in a forest to die

 

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

Call Blocking Android Apps | सातत्याने येणारे ‘स्पॅम कॉल्स’ अडथळा निर्माण करतात? मग ‘या’ 5 अ‍ॅप्समधून नंबर्स करा ब्लॉक, जाणून घ्या

Ration Card | नवीन शिधापत्रिकेसाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी हमीपत्रही ‘ग्राह्य’

 

Related Posts