IMPIMP

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोबाईल देण्याच्या बदल्यात दीड हजार रुपये घेऊन मोबाईल किंवा घेतलेले पैसे न दिल्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात व चेहर्‍यावर दगडाने ठेचून खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune Crime). याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police, Pune) एकाला अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अब्दुल्ला इलीयास सरदार ऊर्फ बबलु (वय ३६, रा. जुना वाडा, बुधवार पेठ, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ईस्माईल ऊर्फ सद्दाम काशिद अली शेख (वय २९, रा. शुक्रवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना डेंगळे पुलाखाली नदीपात्रात मंगळवारी सकाळी पावणेनऊ पूर्वी घडली होती (Pune Crime).

 

याप्रकरणी मुरीय इस्माईल शेख (वय २५, रा. शुक्रवार पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्माईल आणि अब्दुल्ला हे दोघेही मजूर म्हणून काम करत होते. ईस्माईल याने अब्दुल्ला याच्याकडून मोबाईल देण्याच्या बदल्यात दीड हजार रुपये घेतले होते. मात्र, त्याला मोबाईल दिला नव्हता. तसेच घेतलेले पेसे दिले नव्हते. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते.

 

डेंगळे पुलाखाली नदीपात्रात (Dengle Bridge Pune) मंगळवारी सकाळी ईस्माईल शेख याचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या डोक्यावर व चेहर्‍यावर दगडाने ठेचून खून केला होता.
पोलिसांनी चौकशी केल्यावर या दोघांमधील वादाची माहिती मिळाली.
त्यावरुन पोलिसांनी अब्दुल्ला सरदार याला अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | Murder of a youth near Dengle bridge pune shivaji nagar police arrest one

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा

Writer Gita Vishwanath | गीता विश्वनाथ यांच्या ‘अ जर्नी गॉन राँग’ कादंबरीचे प्रकाशन

 

Related Posts