IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दिवसाढवळ्या युवकावर कोयत्याने सपासप वार करुन खून

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्यानजदीक एका युवकाचा खुन (Murder In Pune) करण्यात आल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. त्या युवकाचा 5 ते 6 जणांनी कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे. मारुती लक्ष्मण ढेबे (Maruti Laxman Dhebe) (वय, 23 सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असं खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारुती हा नांदेड फाट्यापासून (Nanded Fata) नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने सपासप वार केले. त्या हल्ल्यामध्ये मारुती ढेबे हा जागीच ठार (Murder On Sinhagad Road) झाला. या घटनेनंतर हल्लेखोर कारमधून पलायन झाले. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झालीय. घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमून गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे (API Niranjan Ranavare), सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे (ASI Pradeep Nande), पोलीस हवालदार रामदास बाबर (Police Constable Ramdas Babar), निलेश राणे (Nilesh Rane), पोलीस नाईक अशोक गिरे (Police Naik Ashok Gire) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आलेय. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असून याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder of Youth on sinhagad road in pune

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

Anti Corruption Bureau (ACB) Nandurbar | 43.75 लाखांच्या लाचेची मागणी ! 4 लाख रुपये स्विकारताना नंदुरबार बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांसह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts