IMPIMP

Pune Crime News | बसमध्ये पाठलाग करुन धक्का मारुन युवतीचा विनयभंग करणार्‍या मजनूला अटक; नळस्टॉप ते कोथरुड डेपो दरम्यानची घटना

by nagesh
Pune Crime News | Bargained wife for money; Handed over to friends for Rs 3,000: Forced wife to engage in prostitution

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | सातत्याने पाठलाग करुन बस प्रवासात धक्का मारुन युवतीचा विनयभंग (Molestation) करणार्‍या मजनूला कोथरुड पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रेम चंदू पवार (वय २९, रा. पिरंगुट पोलीस चौकीशेजारी, घोटावडे फाटा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी भुसारी कॉलनीत राहणार्‍या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४/२३) दिली आहे. हा प्रकार नळस्टॉप ते कोथरुड डेपो दरम्यान १४ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नेहमी नळस्टॉप वरुन बसने रात्री घरी जातात.
१२ जानेवारी रोजी त्या बसने घरी जात असताना पवार याने बस प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत बोलण्याचा बहाणा
करुन माझ्यासोबत मैत्री करशील का असे विचारले.
त्यांची इच्छा नसताना त्यांचा हात हातात घेऊन तुला उद्या माझ्याकडून चहाची पार्टी देतो, असे म्हणाला.
त्यानंतर १४ जानेवारी रोजी रात्री त्या बसने प्रवास करीत असताना तो पाठलाग करत बसमध्ये आला.
त्यांना धक्का मारुन वेगवेगळे हातवारे करुन त्यांचा विनयभंग केला.
पोलिसांनी प्रेम पवार याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Majnu arrested for molesting girl by chasing her in bus; Incident between Nalstop to Kothrud Depot

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला रिक्षाचालकावर कोयत्याने वार; लोहियानगरमधील घटनेत तिघांना अटक

Buldhana Accident | धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थ्याचा बाईक अपघातात दुर्दैवी मृत्यू

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

 

Related Posts