IMPIMP

Buldhana Accident | धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थ्याचा बाईक अपघातात दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Buldhana Accident | buldhana 19 years old student dies in bike accident

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन   Buldhana Accident | बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बी.एस.सीच्या परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामधील एक जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police Station) अंतर्गत येणाऱ्या मेरा बुद्रुक या ठिकाणच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाचे नाव शिवप्रसाद शंकर वायाळ असे आहे. त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. (Buldhana Accident)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?
हा अपघात 28 डिसेंबर रोजी घडला होता. अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बुद्रुक येथील रहिवासी असलेले शिवप्रसाद शंकर वायाळ, देवेंद्र उद्धव पडघान व ऋषी दत्तात्रय पडघान हे तीन विद्यार्थी बी.एस.सीचा पेपर देण्यासाठी आदर्श विद्यालय माहोरा तालुका जाफराबाद या ठिकाणी गेले होते. पेपर देऊन सायंकाळी घरी परत येत असताना त्यांच्या बाइकसमोर अचानक जनावर आडवे आल्याचा भास झाल्याने त्यांची बाईक भरधाव वेगात समोरच्या विद्युत पोलला जाऊन धडकली. यानंतर हे तिघे गंभीर जखमी झाले. (Buldhana Accident)

 

यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी चिखली येथील जंजाळ यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्यापपर्यंत कळू शकले नाही. हा अपघात झाला तेव्हा शिवप्रसाद शंकर वायाळ हा बाईक चालवत होता. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने मानेचा मनका मोडला होता. तर त्याच्या गाडीवर मागे बसलेल्या दोघा जणांना गंभीर मार लागला होता. या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असताना शिवप्रसाद शंकर वायाळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर देवेंद्र उद्धव पडघन आणि ऋषी दत्तात्रय पडघन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Web Title :- Buldhana Accident | buldhana 19 years old student dies in bike accident

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | सिगारेटला पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, वानवडी परिसरातील घटना

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

 

Related Posts