IMPIMP

Pune Crime News | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराफ व्यावसायिकास ‘दणका’, केली मोक्का अंतर्गत कारवाई, जाणून घ्या प्रकरण

by omkar
Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – सोनसाखळी चोरणाऱ्या (Gold chain thief) दोन चोरट्यासह दागिने विकत घेणाऱ्या 19 वर्षीय सराफी तरुणावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta) यांनी मोक्का mcoca (mokka) कारवाई करत दणका दिला आहे. प्रथमच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकावर (goldsmith) कडक कारवाई झाल्याने अवैध प्रकार करणाऱ्या सराफ व्यावसायिकांमध्ये (goldsmith) खळबळ उडाली आहे.

Rakhi Sawant on Baba Ramdev | कोरोना अन् रामदेव बाबा सारखेच (व्हिडीओ)

दीपक परशुराम माळी (वय 19, रा. मुंढवा), मुकेश सुनील साळुंखे (वय 19, रा. हडपसर) आणि सम्राट हुकूमसिंग भाटी (वय 19, रा. चंदननगर) अशी मोक्का कारवाई  केलेल्या तिघांची नावे आहेत.

संजय राउतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं’

दीपक माळी व मुकेश साळुंखे हे सोन साखळी चोरणारे (Gold chain thief) सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, चतुःशृंगी परिसरात झालेल्या सोन साखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने य दोघांना अटक केली होती.
त्यानंतर त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले होते.
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गाड्या जप्त केल्या होत्या.
तर चोरीचे सोने सम्राट भाटी याने घेतले होते.

Nilesh Rane | संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का ?

याप्रकरणात गुन्हे शाखेने या टोळीवर मोक्का कारवाई (mocca action) करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केला होता.
त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे (ashok morale) यांनी या प्रस्तवावर छाननी केली.
त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार या टोळीवर मोक्का लावला आहे.
प्रथमच सोन साखळी चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या आरोपीला अटक करत त्याच्यावर मोक्का कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त यांचा हा 33 वा मोक्का आहे.

Aaditya Thackeray | ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का ?, आदित्य ठाकरे म्हणाले…

Web Title : Pune Crime News Police Commissioner Amitabh Gupta slaps goldsmith, action under mcoca (mokka), find out the case further

Related Posts