IMPIMP

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | शाळेच्या वाटेत उभा राहून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना सहकारनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार 15 एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सहकारनगर परिसरातील शाळेसमोर घडला आहे.

याबाबत पिडीत 12 वर्षीय मुलीच्या 35 वर्षीय आईने सोमवारी (दि.20) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संकेत नितीन चव्हाण Sanket Nitin Chavan (वय-21 रा. तळजाई वसाहत, पुणे) याच्यावर 354 (ड), 323 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी संकेत चव्हाण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी सहकारनगर परिसरातील एका शाळेत शिकते. मुलगी शाळेत जात असताना आरोपी शाळेसमोरील रस्त्यावर थांबवून तिची छेड काढत होता. 15 एप्रिल रोजी मुलगी शाळेत जात असताना आरोपीने मुलीला रस्त्यात आडवले. ‘तु मला आवडतेस, मला हो म्हण, नाहीतर तुला जाऊ देणार नाही’ असे म्हणून तिचा हात पकडून अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. तसेच तिच्या घराजवळ थांबला असता फिर्यादी यांच्या जावयाने त्याला जाब विचारला असता आरोपीने त्याला हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra Board 12th Result 2024 | प्रतिक्षा संपली, उद्या लागणार बारावीचा निकाल, असा पहा तुमचा निकाल

Related Posts